साताऱ्यात रेल्वेचे थांबे वाढविण्यासह प्रवाशांची सुरक्षितता वाढवा : श्रीनिवास पाटील - Increase train stops in Satara and increase passenger safety Says NCP MP Srinivas Patil | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यात रेल्वेचे थांबे वाढविण्यासह प्रवाशांची सुरक्षितता वाढवा : श्रीनिवास पाटील

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

सातारा शहराजवळ रेल्वे पोलिस ठाणे मंजूर झाले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षापासून ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. परिणामी रेल्वे प्रवासादरम्यान चोरी झाल्यास, महिलांच्या बाबतीत काही गैरकृत्य किंवा अनुचित घटना घडल्यावर त्यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी नागरिकांना पुणे किंवा मिरज या ठिकाणी जावे लागत आहे.

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातून जाणा-या लोहमार्गावर रेल्वेचे थांबे वाढवण्यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सातारा रेल्वे पोलिस ठाणे सुरू करावे, अशी मागणी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली आहे. सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या संदर्भातील मुद्दे लोकसभेत उपस्थित करत खासदार श्रीनिवास पाटील यांनी काही मागण्या केल्या आहेत.

खासदार पाटील म्हणाले, पुणे-मिरज-हुबळी मध्य रेल्वे मार्गावरील लोणंद ठिकाणी बाजारपेठ व औद्योगिक क्षेत्र आहे. आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठिकाणावरून जाते. पालखी सोहळ्यास लोखो भाविकांची उपस्थिती असते. परंतु शहर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे. त्यामुळे एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. याठिकाणी एक अंडर पास व दोन ओव्हर ब्रीज बांधले गेल्यास ते नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहेत.

दक्षिण व उत्तरी राज्यातील काही नागरिक जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी पुणे किंवा मिरज रेल्वे स्टेशनवर जावे लागते. रेल्वे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे ठिकाणी मध्य रेल्वेचे थांबे वाढविण्यात यावेत. सातारा शहराजवळ रेल्वे पोलिस ठाणे मंजूर झाले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षापासून ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही.

परिणामी रेल्वे प्रवासादरम्यान चोरी झाल्यास, महिलांच्या बाबतीत काही गैरकृत्य किंवा अनुचित घटना घडल्यावर त्यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी नागरिकांना पुणे किंवा मिरज या ठिकाणी जावे लागत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या व सोयीच्या दृष्टीकोनातून येथे मंजूर असलेले पोलिस स्टेशन लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी सभागृहात केली.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख