पैलवान खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या : श्रीनिवास पाटील

राष्ट्राला दिलेली सेवा आणि कुस्ती क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी नागरिक व क्रीडाप्रेमींमधून होत आहे.
Khashaba Jadhav and MP Srinivas Patil
Khashaba Jadhav and MP Srinivas Patil

कऱ्हाड : भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक कास्यपदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे भूमिपूत्र (पै.) खाशाबा जाधव यांना खासबाब म्हणून मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राव्दारे केली आहे. तसेच राज्य सरकारनेही तशी शिफारस करावी अशी मागणी पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही खासदार पाटील यांनी केली आहे.

खासदार पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना याबाबत पत्र लिहून ही विनंती केली आहे. पत्रात श्री. पाटील यांनी म्हटले की, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्वर येथील खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये फिनलॅन्ड देशाच्या हेलसिंकी शहरामध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाइल बॉटमवेट कुस्तीत कास्यंपदक मिळविले होते.

त्यांच्या या कामगिरीने देशवासियांची मने भरून गेली होती. केंद्र सरकाने 1952 मध्ये त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकिटही छापले होते. 2000 मध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन अवार्ड देऊनही त्यांचा गौरव केला होता. खाशाबा जाधव यांनी त्याकाळी प्रशिक्षण सोयीसुविधांचा अभाव असूनही प्रतिकूल स्थितीत मात करत कामगिरी केली होती. त्यामुळे देशाचे नाव उज्ज्वल झाले होते.

त्यांनी कुस्तीमध्ये मिळविलेले कांस्यपदक 1952 पासून पुढील 44 वर्षे भारतासाठी मिळविलेले एकमेव व्यक्तिगत पदक होते. राष्ट्राला दिलेली सेवा आणि कुस्ती क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी नागरिक व क्रीडाप्रेमींमधून होत आहे.

जीवनकाळातच पद्म पुरस्कार दिला जातो. परंतु विशेषबाब म्हणून हा पुरस्कार दिला जावा. त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्याबाबत राज्य सरकारनेही शिफारस करावी अशी विनंती पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडेही खासदार पाटील यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com