कोयनेतून पाणी सोडताना वडनेरी समितीच्या शिफारशी पाळा : शंभूराज देसाई 

कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठा किती आहे. कोणत्या धरणातून कधी पाणी सोडणार आहे. याचा सविस्तर आढावा शंभूराज देसाईंनी घेत धरणातून पाणी सोडताना प्रशासनाने याची पुर्वकल्पना तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जनतेला दयावी, असेही त्यांनी सांगितले.
Minister shambhuraj desai
Minister shambhuraj desai

सातारा : कोयना धरणात सध्या ७२ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत आठ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे त्यामुळे तुर्तास तरी कोयना धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही. तरीही आपत्ती काळात योग्य व्यवस्थापन व नियोजन करुन तालुका प्रशासनाने सतर्क राहावे. हलगर्जीपणा करु नका. कोयना धरण व्यवस्थापनने वडनेरी समितीच्या शिफारशींचे पालन करावे, अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना धरण व्यवस्थान व पाटण तालुक्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांना दिल्या.

शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात पाटण तालुका प्रशासनाची बैठक झाली.

यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए. व्ही. राख आदी उपस्थित होते. शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या कोयना धरणात होणाऱ्या पाणीसाठयाबाबत व पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर पाणी विर्सगाबाबतची सविस्तर माहिती घेतली.

कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे असे सांगत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तहसिल कार्यालय याठिकाणी २४ तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती काळात तालुक्यात कोणत्याही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षाला माहिती देण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे.

तसेच तात्काळ तोडगा काढून आपत्कालिन परिस्थिती दुर करायची आहे. आपत्कालिन व्यवस्थापन कक्षात एक जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, असे सांगून त्यांनी तहसिलदार यांनी मंडलाधिकारी, तलाठी यांच्यामार्फत कोयना नदीकाठच्या गावांना या काळात सतर्क राहण्याच्या सुचना कराव्यात, असे सांगितले.

कोयना धरणासह कृष्णा खोऱ्याच्या मध्यम धरण प्रकल्पातील पाणीसाठा किती आहे. कोणत्या धरणातून कधी पाणी सोडणार आहे. याचा सविस्तर आढावा शंभूराज देसाईंनी घेत धरणातून पाणी सोडताना प्रशासनाने याची पुर्वकल्पना तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जनतेला दयावी, असेही त्यांनी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com