Due to the economic downturn, there will be a major recession in the country says Congress Leader Prithviraj Chavan | Sarkarnama

अर्थव्यवस्था आकसल्याने देशात मोठी आर्थिक मंदी येणार : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

एकीकडे कोविड आजार आणि दुसरीकडे आर्थिक समस्या आहे. देशाचा एप्रिल ते जुनच्या पहिल्या तीमाहीत अर्थव्यवस्था २४ टक्क्‍यांनी आकसली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होऊन ती पुढे किमान १० ते १५ टक्क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम नोकरी, उद्योग, व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे मोठी आर्थिक मंदी येणार आहे.

कऱ्हाड : कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे एप्रिल ते जुनच्या पहिल्या तीमाहीत देशाचा अर्थव्यवस्था २४ टक्क्‍यांनी आकसली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होऊन ती पुढे किमान १० ते १५ टक्क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम नोकरी, उद्योग, व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे मोठी आर्थिक मंदी येणार आहे. त्याचबरोबर चीन आणि भारताबरोबरचा संघर्ष ही दुसरी समस्या आहे, अशी भिती काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामध्ये बहुतेक असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे.  अनेक कंपन्यांनी लोकांना वर्क फॉर्म होम असे काम सुरु केले आहे. त्यांचे पगार 50 टक्के कपात केला आहे.

त्यामुळे फारच बिकट स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोविड आजार आहे आणि दुसरीकडे आर्थिक समस्या आहे. देशाचा एप्रिल ते जुनच्या पहिल्या तीमाहीत अर्थव्यवस्था २४ टक्क्‍यांनी आकसली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होऊन ती पुढे किमान १० ते १५ टक्क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम नोकरी, उद्योग, व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे मोठी आर्थिक मंदी येणार आहे.

त्याचबरोबर चीन आणि भारताबरोबरचा संघर्ष ही दुसरी समस्या आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाविषयी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले, कोरोना हा चेष्ठेचा विषय नाही. लोकांनी या संकट काळात अंगावर आजार काढणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासाखेच आहे. त्यामुळे शासनाच्या सुचना काटेकोरपणे पाळणे आवश्‍यक आहे.

व्हेंटिलेटरसाठी मी ३० लाखांचा निधी आमदार निधीतुन दिला आहे. त्याचबरोबर सीएसआर फंडातुनही मी व्हेंटिलेटर उपलब्ध करत आहे. मात्र, उत्पादनच कमी असल्याने त्यावरही मर्यादा येत आहेत.'' शासनाच्या ''माझे कुटुंब माझी जबाबदारी'' या योजनेअंतर्गत घरोघरी होणाऱ्या आरोग्य सर्वेत खरी माहिती आरोग्य दुतांना द्या. त्यामुळे तात्काळ निदान होवुन संभाव्य धोका टाळता येईल, असे आवाहन माजी श्री. चव्हाण यांनी केले. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख