नरेंद्र मोदी, अमृता फडणवीस यांच्या बदनामीबद्दल साताऱ्यात गुन्हा  - Crime in Satara for defaming Narendra Modi and Amruta Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदी, अमृता फडणवीस यांच्या बदनामीबद्दल साताऱ्यात गुन्हा 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

अमृता फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बदनामीकारक मजकूर प्रसारीत करून संबंधितांना सोशल मिडियावर व जनमानसान प्रतिमा मलिन केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान अधिनियामनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे अधिक तपास करत आहेत.

सातारा : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सचिन इथापे या नावाच्या फेसबुकचे अकौंट असणाऱ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल अनिल शिवनामे (रा. संगम माहुली) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. 

या फिर्यादीनुसार सचिन इथापे नावाने असलेल्या फेसबुक अकौंटवर गुरूवारी (ता. 15) सकाळी अकरापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आला आहे.

असा मजकूर प्रसारीत करून संबंधितांना सोशल मिडियावर व जनमानसान प्रतिमा मलिन केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान अधिनियामनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे अधिक तपास करत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख