BJP's ploy to overthrow the Congress government on the strength of power and money Says Congress Leader Prithviraj Chavan | Sarkarnama

सत्ता, पैशाच्या जोरावर काँग्रेसची सरकारे पाडण्याचा भाजपचा डाव : पृथ्वीराज चव्हाण  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 27 जुलै 2020

सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. याविरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने आज मुंबईतील राजभवनासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. 

सातारा : विविध राज्यात लोकशाही पध्दतीने निवडल्या गेलेल्या काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड भेद याचा वापर करत आहे. त्यामुळे विरोधात बोलण्याची व लोकशाही वाचाविण्याची वेळ आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 
 
भाजपकडून काँग्रेसची सुरू असलेली मुस्कटदाबीविरोधात काँग्रेसचे सर्वच नेते सक्रिय झाले असून याला कडाडान विरोध करण्याची तयारी काँग्रेस करू लागली आहे. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (ता. २७) सकाळी अकरा वाजता मुंबई येथे राजभावनासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्टिटरच्या माध्यमातून भाजपवर सडेतोड टिका केली आहे. भाजपच्या या भुमिकेमुळे लोकशाहीच अडचणीत आल्याची टिकाही श्री. चव्हाण यांनी केली आहे.

ते म्हणातात, राज्यांमध्ये  लोकशाही पध्दतीने निवडलेली काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आहे. देशातील प्रत्येक संभाव्य संस्था ताब्यात घेण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे आता याविरोधात भुमिका घेण्याची आणि लोकशाही वाचविण्याची वेळ आली आहे.

  दरम्यान, सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. याविरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने आज मुंबईतील राजभवनासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख