दूध उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही : फडणवीस

श्री. फडणवीस म्हणाले, भाजप महायुती सरकारच्या काळात दूध दराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा दूधसंघांना प्रतिलिटर दूध खरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते.
BJP Leader Devendra Fadanvis
BJP Leader Devendra Fadanvis

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच आहेत. दुसरीकडे राज्य सरकार कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून, त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

भाजपच्या आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महादेवराव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे तसेच इतर नेते उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, भाजप महायुती सरकारच्या काळात दूध दराचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा दूधसंघांना प्रतिलिटर दूध खरेदीसाठी अनुदान देण्यात आले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी तसेच दूध निर्यातीसाठी सुद्धा भरीव अनुदान देण्यात आले होते. 

दूध उत्पादकांचा लढा आता निर्णायक टप्प्यात नेला जाईल. पक्षातर्फे रितसर आंदोलनाची घोषणा केली जाईलच.  या कठीण प्रसंगी दूध उत्पादकांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. ही लढाई संपेस्तोवर भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही, असेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com