Breaking सचिन वाझेची आणखी एक अलिशान गाडी सापडली - NIA Seized one more Outlander car used by Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

Breaking सचिन वाझेची आणखी एक अलिशान गाडी सापडली

सूरज सावंत
मंगळवार, 30 मार्च 2021

अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकणात एनआयएच्या अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हीआऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

मुंबई : अँटिलिया बाँब प्रकरण आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकणात एनआयएच्या (NIA) अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हीआऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.  NIA Seized one more Outlander car used by Sachin Waze

ही आऊटलँडर कामोठे (Kamothe) परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती. बरेच दिवस गाडी वापरात नसल्याने स्थानिकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना (Police) दिली. ज्यावरून या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे(Sachin Waze) नावाची व्यक्ती असल्याचं स्पष्ट झाले आहे. एनआयएची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे.

आतापर्यंत एनआयएला वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, १ प्राडो, १ इनोव्हा, अँटिलिया बाहेर स्फोटके सापडलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर (Outlander) अश्या सहा गाड्या मिळालेल्या आहेत. या व्यतिरिक्त एनआयए अजून एक आऊटलँडर, ऑडी (Audi) आणि स्कोडा (Scoda) या गाड्यांच्या शोधात आहे.

दरम्यान, एनआयचे (NIA) डीआयजी विधी कुमार दिल्लीवरून मुंबईत येणार आहेत. अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी ते आज मुंबईत दाखल होणार आहेत. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन विधी कुमार हे तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

एनआयने क्राईम ब्रांचमध्ये काम केलेल्या एका अधिकाऱ्याला समन्स पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. या अधिकाऱ्याची नुकतीच क्राईम ब्रँचमधून (Crime Branch) बदली करण्यात आली आहे.NIA Seized one more Outlander car used by Sachin Waze

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात या अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  मनसुख यांची हत्या करण्यात आली तेव्हा हा अधिकारी पोलीस आयुक्तालयातील सीआययु च्या कार्यालयात होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सचिन वाझेने आपला फोन त्याच्याकडे दिला होता आणि कोणाचा फोन आलाच तर तो रिसिव्ह करून वाझे ऑफिसमध्ये असून बिझी असल्याचे सांगायला सांगितले होते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.  

या आधीही या अधिकाऱ्याची एटीएसकडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एनआयएला संशय आहे की वाझे ठाण्याला गेले होते तेव्हा हा फोन या अधिकाऱ्याकडे मुद्दाम देण्यात आला होता. NIA Seized one more Outlander car used by Sachin Waze
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख