मुंबई-पुणे एक्‍सप्रेसवेच्या प्रवाशांनो आता पाकिटात पैसे जरा जास्त ठेवा....

मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवेचा टोल दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे. महामंडळानं नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली असल्याने, नव्या दरांमध्ये पुढील 15 वर्ष ही टोल वसूली केली जाणार आहे
Mumbai Pune Expressway Toll May be increased
Mumbai Pune Expressway Toll May be increased

मुंबई : मुंबई-पुणे एक्‍स्प्रेसवेचा टोल दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे. महामंडळानं नव्या कंत्राटदाराची नेमणूक केली असल्याने, नव्या दरांमध्ये पुढील 15 वर्ष ही टोल वसूली केली जाणार आहे. मात्र, या टोल वाढीमुळे तोट्यात असलेल्या एसटी महामंडळावर सुद्धा नाहक अतिरीक्त भुर्दंड पडण्याची शक्‍यता आहे.

मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर धावणाऱ्या कार, मिनीबस, ट्रक, बस, अवजड वाहने, क्रेन अशा वाहनांच्या टोल भाड्यांमध्ये वाढ होणार आहे. यामध्ये सर्वात जास्त टोल क्रेनचा 280 रूपयाने वाढणार आहे. तर अवजड वाहने 212 रूपयाने तर त्याखालोखाल एसटी महामंडळाचा सुद्धा 122 रूपयाने टोल वाढणार आहे.

एक्‍सप्रेसवेच्या मार्गाच्या उभारणीपासून देखभाल दुरूस्ती व टोल आकारणीचे कंत्राट पुन्हा आयआरबीला देण्यात आला आहे. नव्या करारानूसार आयआरबी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीकडून 8262 कोटी रूपये रस्ते विकास महामंडळाला मिळणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच टोल वाढीसंदर्भात अधिसुचना काढली आहे. त्याप्रमाणे दर तिन वर्षाने 18 टक्के वाढ टोल मध्ये केल्या जाते. त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा ती वाढ केली असल्याचे एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता शशीकांत सोनटक्के यांनी सांगितले.

असे असतील नवे दर

वाहन सध्याचे टोल दर नवे दर (1 एप्रिल पासून)
 
कार  230 रूपये 270 रूपये
 
मिनी बस 355 रूपये 420 रूपये
 
ट्रक  493 रूपये

580 रूपये

बस  675 रूपये 797 रूपये
 
अवजड वाहने 1168 रूपये 1380 रूपये
 
क्रेन  1555 रूपये 1835 रूपये

एसटीच्या अतिरिक्त भुर्दंड म्हणून टोलचा बोजा एसटीवर पडणार आहे. त्यामुळे कोणतीही प्रवाशांची भाडेवाढ होणार नाही.
- राहूल तोरो,महाव्यवस्थापक, वाहतूक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com