दख्खनच्या राणीला निसर्गाची शाल! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्‍स्प्रेसच्या 17 डब्यांवर नागझिरा अभयारण्यातील निसर्गचित्रे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये लाल डोक्‍याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातींचे गरूड, पोपट, स्थलांतरित व दुर्मीळ पक्षी; तसेच फुललेले पळस व मोह वृक्ष यांचा समावेश आहे.
Deccan Queen to get new look from today
Deccan Queen to get new look from today

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन गाडीवर नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. निसर्गाची शाल परिधान केलेल्या दख्खनच्या राणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी (ता. 14) हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्‍स्प्रेसच्या 17 डब्यांवर नागझिरा अभयारण्यातील निसर्गचित्रे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये लाल डोक्‍याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातींचे गरूड, पोपट, स्थलांतरित व दुर्मीळ पक्षी; तसेच फुललेले पळस व मोह वृक्ष यांचा समावेश आहे. निसर्गाची शाल पांघरलेल्या दख्खनच्या राणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 12 वर हिरवा झेंडा दाखवतील.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) वेगवेगळ्या ठिकाणी 23 पर्यटक निवास आहेत. डेक्कन क्वीनवर छायाचित्रे झळकावून नागझिरा व अन्य पर्यटक निवासांची प्रसिद्धी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात नागझिरा अभयारण्य व विदर्भाकडे आकर्षित होतील, असा विश्‍वास एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com