mumbai politics | Sarkarnama

शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशनाची विरोधकांची मागणी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीने रोखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करण्यासाठी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणार आहे. 

मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीने रोखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करण्यासाठी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणार आहे. 

या शिष्टमंडळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते अबू असिम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे आदींचा समावेश असेल. 

"वस्तू व सेवा कर' विधेयक अमलात आणण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने घेतले जात आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठीही विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्‍यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यपालांनी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांचे नेते करणार असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख