Mumbai Political News Prakash Ambedkar Says CM Should have Camped in Kolhapur | Sarkarnama

सरकारने हेलिकाॅप्टरचा वापर पूरग्रस्तांसाठी नव्हे तर मंत्र्यांच्या फिरण्यासाठी केला - प्रकाश आंबेडकर

राजू सोनवणे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरा संदर्भात जी काही काळजी घ्यायाला पाहिजे ती घेतली गेली नाही. सर्व धरणांचे दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आले. त्यामुळे पाणी आलमटी धरणात सोडण्यात आलं. आज 2लाख 22 हजार जनावर अडकलेली आहेत. 70 हजार माणसं बाधित आहेत. पाणी अजून ही उतरत नाही, अशी स्थिती आहे. या पुरात अडकलेल्या लोकांना स्थानिक लोकांनी वाचवलं आहे. सर्व वस्तू स्थानिकांनी पुरवल्या आहेत.- प्रकाश आंबेडकर

मुंबई : ''सरकारने हेलिकॉप्टर चा वापर केला तो फक्त मंत्र्यांना फिरण्यासाठी केला आहे. कोल्हापूर पूर्ण जिल्हा आणि सांगली अर्धा जिल्हा पाण्याखाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जर कोल्हापूरमध्ये मुक्काम केला असता आणि तिथून सूत्र हलवली असती तर काम लवकर झालं असतं," असे प्रतिपादन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. 

पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, "कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरा संदर्भात जी काही काळजी घ्यायाला पाहिजे ती घेतली गेली नाही. सर्व धरणांचे दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आले. त्यामुळे पाणी आलमटी धरणात सोडण्यात आलं. आज 2लाख 22 हजार जनावर अडकलेली आहेत. 70 हजार माणसं बाधित आहेत. पाणी अजून ही उतरत नाही, अशी स्थिती आहे. या पुरात अडकलेल्या लोकांना स्थानिक लोकांनी वाचवलं आहे. सर्व वस्तू स्थानिकांनी पुरवल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हेलिकॉप्टर च्या माध्यमातून आम्हाला मदत पुरावा म्हणजे ती लोकांपर्यंत पोहचवता येईल, मात्र सरकारने ते केलं नाही. त्यामुळे आम्ही शासनाचा निषेध करतो.'' २००५ च्या पुरातही काँग्रेसने असंच केलं होतं. कारण त्यावेळी मी पुरात अडकलो होतो, असंही आंबेडकर म्हणाले, 

''येत्या 10 दिवसात कस हवामान राहील याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. भरलेली धरण फुटू नये याचा अंदाज घेतला पाहिजे. शेजारच्या राज्याशी संवाद साधून एक कंट्रोलरूम तयार केली पाहिजे. चार राज्यांच एकमत झालं नाही तर मोठी हानी होऊ शकते," असेही आंबेडकर म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख