मुंबई पोलिस दलात ९ नवे उपयुक्त  - Mumbai Police officers transferred | Marathi News-Sarkarnama

मुंबई पोलिस दलात ९ नवे उपयुक्त 

सरकारनामा
गुरुवार, 18 जुलै 2019

उपायुक्त दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे, तर पाच उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. उपायुक्त दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे, तर पाच उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

यात आठ भारतीय प्रशासकीय सेवा (भापोसे) आणि सहा राज्य पोलिस सेवेतील (रापोसे) आहेत. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या बदल्यांचा कार्यालयीन आदेश बुधवारी जाहीर करण्यात आला.

अशा झाल्या बदल्या...

उपायुक्त  -  पूर्वीची नेमणूक -  नवी नेमणूक

अंकित गोयल -  परिमंडळ 2 ठाणे -  परिमंडळ 10

डॉ. मोहन दहिकर - एटीएस -  परिमंडळ 11

डी. एस. स्वामी - विशेष शाखा एक ठाणे - परिमंडळ 12

सी. के. मीणा - राज्य राखीव बल गट क्रमांक 8 मुंबई - सशस्त्र पोलिस नायगाव

प्रणय अशोक - राज्य राखीव पोलिस बल गट क्र 4 नागपूर - अभियान

नंदकिशोर ठाकूर - एमपीएस नाशिक - सशस्त्र पोलिस ताडदेव

श्रीकांत परोपकारी - एसीबी औरंगाबाद - आर्थिक गुन्हे शाखा (विशेष कृती दल)

रंजन शर्मा - गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर - वाहतूक (मुख्यालय व पूर्व उपनगरे)

सोमनाथ घार्गे - पोलिस प्रशिक्षण केंद्र मरोळ - सशस्त्र पोलिस मरोळ

संग्रामसिंह निशाणदार - मुंबई परिमंडळ 11 - परिमंडळ 1

राजीव जैन - आर्थिक गुन्हे शाखा (विशेष कृती दल) - परिमंडळ 2

नियती ठाकर - सशस्त्र पोलिस नायगाव - परिमंडळ 5

मंजुनाथ सिंगे - अभियान - परिमंडळ 5

शहाजी उमप - वाहतूक (मुख्यालय व पूर्व उपनगरे) - गुन्हे प्रकटीकरण

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख