खारफुटीवरील अतिक्रमणांवरुन नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांचा भाजपला घरचा आहेर

गोराईत खारफुटी उद्यान होत आहे; पण खारफुटीवर होणाऱ्या अतिक्रमणाचे काय? हे अतिक्रमण आताच रोखले नाही, तर भूमिपूजनाच्या जागेवरही अतिक्रमण होईल, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी राज्य सरकारला दिला.
खारफुटीवरील अतिक्रमणांवरुन नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांचा भाजपला घरचा आहेर

मुंबई : गोराईत खारफुटी उद्यान होत आहे; पण खारफुटीवर होणाऱ्या अतिक्रमणाचे काय? हे अतिक्रमण आताच रोखले नाही, तर भूमिपूजनाच्या जागेवरही अतिक्रमण होईल, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी राज्य सरकारला दिला. योगेश सागर हे त्यांच्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखले जातात. अनेक वेळा त्यांच्या सडेतोड स्वभावामुळे पक्षाची गोचीदेखील झाली आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीत टक्केवारी चालते, असा आरोप त्यांनी नगरसेवक असताना बैठकीत केला होता. आपण काही तरी जास्त बोललो असल्याचे लक्षात आल्यावर अधिकाऱ्यांची टक्केवारी चालते, अशी सारवासारवही त्यांनी केली. सध्या त्यांना नगरविकास राज्यमंत्रिपद मिळाले आहे; मात्र त्यांचा सडेतोड स्वभाव आजही बदललेला नाही. 

सागर यांनी खारफुटीवरील अतिक्रमणावर बोट ठेवले. गोराई येथील सेक्‍टर आठ आणि दहामधील खारफुटीवर होणारे अतिक्रमण ही लाजिरवाणी गोष्ट आहे. येथील जागेवर अतिक्रमण करून गोदामे उभारण्यात आली आहेत. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जागा म्हाडाची असल्याचे सांगितले जात आहे. खारफुटीची जागा कोणाचीही असो, पण ती संरक्षित राहिली पाहिजे. ते सुरक्षित केले नाही, तर भूमिपूजनच्या जागेवरही अतिक्रमण होईल, असे सांगत अतिक्रमण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे जावे का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थितांना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com