शिवसेनेचे गड खिळखिळे करण्याचे भाजपचे डावपेच

शिवसेना आणि भाजप यांच्यात रोज खटके उडत आहेत. सरकारवरटीका करायची एकही संधी शिवसेना सोडत नाही. दोन्ही पक्ष सत्तेत असूनहीएकमेकांचे कडवे स्पर्धक आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे गड खिळखिळेकरण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची जमवाजमव करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे.
शिवसेनेचे गड खिळखिळे करण्याचे भाजपचे डावपेच

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात रोज खटके उडत आहेत. सरकारवर
टीका करायची एकही संधी शिवसेना सोडत नाही. दोन्ही पक्ष सत्तेत असूनही
एकमेकांचे कडवे स्पर्धक आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे गड खिळखिळे 
करण्यासाठी तुल्यबळ उमेदवारांची जमवाजमव करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. 

राज्यात एकहाती सत्ता मिळविणे हे भाजपचे उद्दीष्ठ आहे. त्यादृष्टीने 
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. विधानसभेच्या 
मुंबईतील सर्वच्या सर्व 36 जागा जिंकून मुंबईत ताब्यात घेण्यासाठी भाजप
 व्युहरचना आखत आहे. मुंबईतील अकरा विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद
 आहे. ही ताकद खिळखिळी कशी करता येईल या दृष्टीने भाजपची चाचपणी सुरू आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवकांना जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या
प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे.


शिवसेनेचे आमदार आणि माजी महापौर सुनील प्रभू यांचा 2009 च्या विधानसभा
निवडणूकीत दिंडोशी मतदार संघातून पालिकेचे तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि
 कॉंग्रेसचे नगरसेवक राजहंस सिंह यांनी पराभव केला होता. याच मतदार
संघातून प्रभू हे गेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आले. सिंह यांना
 पक्षात खेचण्यात भाजपला यश आले आहे. त्यांचा रितसर भाजपात प्रवेशही झाला
 आहे. आता प्रभू यांना टक्कर देण्यासाठी सिंह यांचा भाजपा वापर करणार आहे.
 दिंडोशीमध्ये भाजपने "लिगल सेल' सुरू करून विधानसभेच्या दृष्टीने कामही
सुरू केले आहे. 

अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले
 विद्यमान आमदार तुकाराम काते यांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांवरील आपली
 नाराजी उघड केली. आमदारांची कामे मंत्र्यांकडून होत नसल्याची टीका करून 
त्यांनी खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदार संघातील 
विरोधी पक्षातील तुल्यबळ लोकप्रतिनिधींचा शोध घेवून त्यांना रसद 
पुरविण्याचे काम सद्या भाजप करीत असल्याचे समजते. कॉंग्रेसचे नेते नारायण 
राणे यांची नवरात्रीच्या दरम्यान भाजप प्रवेशाची चर्चा आहे. राणे 
भाजपामध्ये गेल्यास भाजपची ताकद वाढण्याची शक्‍यता आहे.

नाराजीचा फायदा

शिवसेनेचे आमदार आणि खासदार हे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत आणि अनिल
 देसाई यांच्यावर नाराज असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तूळात होती. आमदार 
आणि नगरसेवकांमधील नाराजी तसेच पदाधिकाऱ्यांमधील नाराजी याचा फायदा 
उठविण्यासाठी भाजपने ताकद लावली असल्याचे समजते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com