ओबीसी खात्याचे सचिवपद स्वीकारण्यास राधिका रस्तोगी अनुच्छूक ?

इतर मागास वर्गीय (ओबीसी) या नवीन खात्याच्या सचिव पदासाठी राधिका रस्तोगी यांच्या नियुक्तीचा आदेश काढून १५ दिवस उलटले. तरीही रस्तोगी यांनी या खात्याची अद्याप सूत्रे स्वीकारली नाहीत. रस्तोगी यांना या खात्यात काम करण्यात रस नसल्यानेच त्या सूत्रे स्वीकारण्यास तयार नसल्याचे सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
ओबीसी खात्याचे सचिवपद स्वीकारण्यास राधिका रस्तोगी अनुच्छूक ?

मुंबई : इतर मागास वर्गीय (ओबीसी) या नवीन खात्याच्या सचिव पदासाठी राधिका रस्तोगी यांच्या नियुक्तीचा आदेश काढून १५ दिवस उलटले. तरीही रस्तोगी यांनी या खात्याची अद्याप सूत्रे स्वीकारली नाहीत. रस्तोगी यांना या खात्यात काम करण्यात रस नसल्यानेच त्या सूत्रे स्वीकारण्यास तयार नसल्याचे सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

ओबीसींची व्होटबॅंक लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वी हे खाते नव्याने तयार केले. यापूर्वी सामाजिक न्याय खात्यातच ओबीसींचा समावेश होत होता. पण सामाजिक न्याय खात्यातून विमुक्त व भटक्या जाती - जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग इत्यादी प्रवर्गासाठी स्वतंत्र ओबीसी खाते तयार केले. या खात्याचे मंत्रिपद प्रा. राम शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी सचिव पदावर राधिका रस्तोगी यांची नियुक्ती केली.
 
परंतु रस्तोगी यांनी या खात्याची सूत्रे स्विकारली नसल्याने मंत्रालयात उलटसुलट चर्चा रंगली आहे. रस्तोगी यांना या खात्यात स्वारस्य नसल्याचे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. या खात्याला पूर्णवेळ सचिव नसल्याने सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान सचिव दिनेश वाघमारे हेच ओबीसी खात्याचाही कारभार सांभाळत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com