पडळकरांना कुठे पाठवयाचं हे आपण ठरवू : प्रकाश आंबेडकर

गोपीचंद पडळकर यांना कोणत्या पक्षात पाठवायचं हे पहिल्यांदा आपण ठरवू, पण त्यांची सर्वात पक्षात चर्चा आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत 'एमआयएम' स्वबळावर लढणार असल्याबाबतची माहिती माझ्याकडे आलेली नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
पडळकरांना कुठे पाठवयाचं हे आपण ठरवू : प्रकाश आंबेडकर

मुंबई : गोपीचंद पडळकर यांना कोणत्या पक्षात पाठवायचं हे पहिल्यांदा आपण ठरवू, पण त्यांची सर्वात पक्षात चर्चा आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत 'एमआयएम' स्वबळावर लढणार असल्याबाबतची माहिती माझ्याकडे आलेली नाही, असेही आंबेडकर म्हणाले. 

गोपीचंद पडळकर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी ते चर्चा करणार असून तेथील धनगर समाजासह अन्य जाती- जमतीमधील कार्यकर्ते, नेत्यांचा आग्रह असल्याचे पडळकर यांचे म्हणणे आहे. वंचित बहुजन आघाडी की शेकाप मधून लढणार हे निश्चीत नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे.  जेष्ठ आमदार आणि धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com