mumbai news MLA Ramesh Kadam | Sarkarnama

मी लवकरच तुरूंगातून बाहेर येणार : आमदार रमेश कदम

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई : "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी माझ्याविरोधात सीआयडी आणि इतर यंत्रणेला आपल्या कोणतेही ठोस पुरावे भेटले नाहीत. चुकीचे गुन्हे दाखल झाले असल्याने त्यातील सत्य आता समोर येत आहे. त्यामुळेच मला लवकरच जामीन मिळेल,'' असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी केला. 

 मंत्रालयात गृहसचिवांकडे आज सुनावणीसाठी आल्यानंतर यांनी यासंदर्भात माहिती दिली. "पोलीस आणि सीआयडीच्या यंत्रणांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले. त्याला आता आव्हान दिले दिले असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच कारागृहातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात मी अनेकांच्या तक्रारी केल्या. त्यामुळे प्रशासनाकडून मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला. भायखळा जिल्हा कारागृहाचे अधिक्षक सी. ए. इदूंरकर यांनी पात्रता नसताना राष्ट्रपती पुरस्कार मिळवला असून त्याची अनेक पात्रतेची कागदपत्रेही बोगस असल्याची तक्रार मी केली आहे. त्याविरोधात गृह विभागाने चौकशी करावी, अशी मागणी गृह सचिवांकडे केली.

"मंजुळा शेटे हत्या प्रकरण हे कारागृहाच्या भ्रष्टाचाराचे केवळ एक छोटेसे टोक असून प्रचंड मोठ्या प्रमाणात येथे भ्रष्टाचार होत असून त्याविरोधातील एक लेखी तक्रार आज राज्याच्या मुख्य गृह सचिवांना दिली आहे. त्यावर कारवाई सुरू झाल्यास अनेक प्रकरणे समोर येतील. अनेक जणांना बेड्या बसतील,'' अशी माहितीही कदम यांनी मंत्रालय परिसरात बोलताना दिली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख