Mumbai news - Maratha morcha - ashish- Shelar | Sarkarnama

आशिष शेलारांना मराठा मोर्चात धक्काबुक्की

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानावर आलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आले. तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.

मुंबई - मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानावर आलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना कार्यकर्त्यांकडून रोखण्यात आले. तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.

आम्ही आमचं लढू म्हणत मराठा बांधवांनी राजकीय नेत्यांना मराठा क्रांती मोर्चातून हुसकावून लावण्यात आले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानात प्रवेश करण्यापासून मोर्चेकऱ्यांनी रोखले, तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. आझाद मैदानाच्या प्रवेशद्वारावरच ही घटना घडली. मात्र, आशिष शेलारांकडून अशी घटना घडली नसल्याचे म्हटले आहे.

मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आता राजधानी मुंबईत धडकले असून, जणूकाही अरबी समुद्राच्या किनारी भगवे वादळ तयार झाले आहे. अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा बांधव एकवटले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा होईल या इर्षेनं विक्रमी संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.

`सरकारनामा'वरील विश्लेषण आणि घडामोडींसाठी क्लिक करा :

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख