Mumbai News - Maharashtra Assembly Session-ramraje nimbalkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

आदिवासी विभागातील घोटाळ्याचा अहवाल विधानपरिषदेत मांडा : सभापती नाईक-निंबाळकर

तुषार खरात
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

आदिवासी विकास विभागातील घोटाळ्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या एम. एस. गायकवाड समितीचा अहवाल विधानपरिषदेच्या सभागृहात मांडा, अशी सुचना सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांनी केली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व या खात्याच्या सचिव मनिषा वर्मा यांना ही सुचना केल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`ला सांगितले.

मुंबई : आदिवासी विकास विभागातील घोटाळ्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या एम. एस. गायकवाड समितीचा अहवाल विधानपरिषदेच्या सभागृहात मांडा, अशी सुचना सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांनी केली आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व या खात्याच्या सचिव मनिषा वर्मा यांना ही सुचना केल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`ला सांगितले.

सभापतींच्या दालनात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापतींनी अहवाल मांडण्याबाबत सुचना केली. या अहवालात सुनील झवर व गव्हाणे नावाच्या दोन प्रमुख कंत्राटदारांनी घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा अहवाल सभागृहात मांडण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात आग्रह धरला होता. विशेष म्हणजे, घोटाळ्यामधील दोषी असणा-यांवर केलेल्या कारवाईचा अहवालही हिवाळी अधिवेशनात मांडण्याची सूचना सभापतींनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी पुरविण्यात येत असलेल्या अन्न धान्य व किराणा सामुग्रीच्या निविदा काढल्या आहेत. पण या निविदांची अद्याप अंमलबजावणी न करता जुन्याच दरानुसार अन्न धान्य पुरविण्यात येत आहे. नवीन निविदांची अंमलबजावणी का करत नाही, अशी विचारणा सभापतींनी केली. त्यावर तत्काळ अंमलबजावणी करण्याची आदिवासी विकास विभागातील अधिका-यांनी तयारी दर्शविली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख