कालिदास कोळंबकर करणार भाजपमध्ये प्रवेश ?

वडाळा-नायगावचे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती 'सरकारनामा'ला विश्वासनीय सूत्रांनी दिली.
कालिदास कोळंबकर करणार भाजपमध्ये प्रवेश ?

मुंबई : वडाळा-नायगावचे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती 'सरकारनामा'ला विश्वासनीय सूत्रांनी दिली. 

तब्बल पाच वेळा आपल्या मतदारसंघातून निवडून आलेले कोळंबकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय समजले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर कोळंबकर देखील कमळ हातात धरणार ही बाब समोर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ पहायला मिळेल.

आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून करणाऱ्या कोळंबकरांनी नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोळंबकर हे आपल्या विभागातील लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. कोळंबकरांनी पक्षांतर करून देखील तेथील मतदारांनी नेहमीच त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. कोळंबकर यांनीसुध्दा कधीही मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. पक्षाला मुंबईत आणखीन बळकट बनविण्यासाठी भाजपला  कोळंबकरांसारख्या नेत्यांची गरज आहे. कोळंबकरांसोबत अजूनही काही काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com