राज यांच्यावरील कारवाईबाबत दहा दिवसांपूर्वीच नांदगावकरांना सांगितले होते : प्रकाश आंबेडकर

''राज ठाकरे यांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे, त्यांना वाचवायचा प्रयत्न करा असे मी दहा दिवसांपूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांना सांगितले होते. त्यांनी तो प्रयत्न केला की नाही हे मला माहित नाही," असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज यांच्यावरील कारवाईबाबत दहा दिवसांपूर्वीच नांदगावकरांना सांगितले होते : प्रकाश आंबेडकर

मुंबई : ''राज ठाकरे यांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे, त्यांना वाचवायचा प्रयत्न करा असे मी दहा दिवसांपूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांना सांगितले होते. त्यांनी तो प्रयत्न केला की नाही हे मला माहित नाही," असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटिस बजावण्यात आली आहे. त्याबद्दल बोलताना आंबेडकर पुढे म्हणाले, "जे कोणी पक्षात जाणार नाही त्याना ही असा त्रास सहन करावा लागणार आहे. ब्लॅक मेलिंगचे हे राजकारण पाहायला मिळते आहे. पण राज ठाकरे याला बळी पडतील अस वाटत नाही. 

"ज्यांना आरक्षण नको आहे त्यांनी भाजपा सोडली पाहिजे. राजकीय निर्णय घेतला पाहिजे. आरक्षण नको यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पहिल्या पासून प्रयन्त करत आहेत," असेही आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com