एल्फिन्स्टन स्थानकावर चेंगराचेंगरी; 19 ठार, 30 जखमी; रेल्वेमंत्री गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी

पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर गर्दीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 19 जण मृत्युमुखी पडले, तर 30 जण जखमी झाले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज लोकलने प्रवास करण्याचे नियोजित आहे. संतप्त जमावाने रेल्वेमंत्री गोयल यांच्याविरुद्ध जोरदार घाेषणाबाजी केली.
एल्फिन्स्टन स्थानकावर चेंगराचेंगरी; 19 ठार, 30 जखमी; रेल्वेमंत्री गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर गर्दीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 19 जण मृत्युमुखी पडले, तर 30 जण जखमी झाले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज लोकलने प्रवास करण्याचे नियोजित आहे. संतप्त जमावाने रेल्वेमंत्री गोयल यांच्याविरुद्ध जोरदार घाेषणाबाजी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. सकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्याचवेळी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलावर प्रचंड गर्दी झाली. हा पूल कायम गर्दीने भरून वाहत असतो.  अचानक कुणीतरी स्थानकावर शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरवली आणि त्यामुळे प्रवाशांची पळापळ झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास ३० जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील 15 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

यामध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सुरवातीला आले होते. मात्र, हा आकडा वाढला असून तो पंधरावर पोचला आहे. दरम्यान, २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेच्या पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण बेशुद्ध पडले आहेत.

केईएम हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी पावणेबारा वाजता दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणण्यात आलेल्या 15 लोकांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झालेला होता.  

सकाळी ११ च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर ही घटना घडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. याशिवाय डॉक्टरांचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. अतिशय अरुंद असलेला पूल, त्यातच आलेला पाऊस आणि पूल कोसळल्याची पसरवण्यात आलेली अफवा यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जुन्या पुलांची दुरुस्ती आवश्यक आहे.  मुंबईत दहा ते बारा ठिकाणी तातडीने कामाची गरज आहे.  रेल्वे मंत्र्याशी याबाबत पुन्हा चर्चा करणार आहे.  
- खासदार किरीट सोमय्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com