माजी आमदाराच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न‍; पोलिसाने वाचविले प्राण

पोलिसांना योग्य वेळी माहिती मिळाली...
Police 11
Police 11

मुंबई : पोलिसांच्या सतर्कतेविषयी अनेकदा उपरोधिक विनोद केले जातात. पण एका पोलिस वाहतूक कर्मचाऱ्याने धाडस दाखवत एका माजी आमदाराच्या पत्नीला आत्महत्या करण्यापासून वाचविल्याचे पुढे आले आहे. ही घटना मानखुर्द येथील पुलावर घडली. एक महिला पुलावर चढली असल्याची माहिती एका दुचाकी चालकाने वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला दिली. त्यानंतर चक्रे फिरली. (Wif of Ex MLA attempt of suicide at Mankhurd bridge)

काल (23 मे) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. तेथे वाहतूक नियंत्रण करत असलेल्या ढगे नावाच्या पोलिस काॅन्स्टेबलने तातडीने धाव घेतली. पोलिस नियंत्रण कक्षालाही ही बाब कळाल्यानंतर तेथूनही कुमक पाठविण्यात आली. संबंधित महिलेचे मन वळविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी अधिक चौकशी करता तिने आपण माजी आमदाराची पत्नी असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. कौटुंबिक वादामुळे मी तणावात होते अशी कबुली या महिलेने दिली. या महिलेला नंतर नवी मुंबई पोलिसांकडे सोपण्यात आले. वाशी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

आर्थररोड जेलमध्ये सराईत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न...

पँन्टच्या अॅल्युमिनियम बटनाला धार काढून हातावर केले वार करून आणि अंडरप्ँन्टच्या इलॅस्टिकने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न आर्थररोड जेलमध्ये एका आरोपीने केल्याचे उघड झाले. माज आयुब खान असे या आरोपीचे नाव असून  शाहूनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला 3 डिसेंबर  2020 रोजी त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये केली होती.

16 एप्रिल 2021 रोजी त्यास कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने क्वारंटाईन केले होते. तेथूनही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या या कृत्यामुळे त्याला अतिसुरक्षा विभागात ठेवले होते. त्याला इतर यार्डात ठेवण्यात यावे. म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्यावर कारागृहातील वैद्यकिय अधिकारी उपचार करत आहेत. त्याच्या या कृत़्या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्याला स्वतंत्र ठेवूनही आणि आर्थररोड साऱख्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या तुरुंगात दाखल करूनही त्याने हे कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com