एनसीबीची मोठी कारवाई...टॉलीवूड अभिनेत्रीला हॉटेलमधून ड्रग्जसह घेतले ताब्यात

बॉलीवूडमधील ड्रग्जची पाळेमुळे खणून काढण्याची कारवाई एनसीबीकडून सुरू आहे. या प्रकरणी एनसीबीने टॉलीवूडमधील अभिनेत्रीला मुंबईतील हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे.
Narcotics Control Bureau detained a Tollywood actress in  Mumbai hotel
Narcotics Control Bureau detained a Tollywood actress in Mumbai hotel

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. बॉलीवूडमधील ड्रग्जची पाळेमुळे खणून काढण्याची कारवाई एनसीबीकडून सुरू आहे. या प्रकरणी एनसीबीने टॉलीवूडमधील अभिनेत्रीला मुंबईतील हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली होती. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला होता. या प्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्यासह काही जणांची एनसीबीने चौकशी केली आहे. चित्रपटसृष्टीतील ड्रग्जच्या वापराविरोधात एनसीबीकडून कारवाई सुरू आहे. 

एनसीबीने काल रात्री मीरा रोड येथील हॉटेलवर छापा टाकला. या वेळी ड्रग्जचा पुरवठा करणारा चाँद मोहम्मद याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून 400 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 8 ते 10 लाख रुपये आहे. ड्रग्ज मुख्य पुरवठादार अद्याप फरार आहे. याचबरोबर टॉलीवूडमधील अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले असून, तिचे वय 20 आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियाला एनसीबीने 6 सप्टेंबरला अटक केली होती. शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांना एनसीबीने 4 सप्टेंबरला अटक केली होती. न्यायालयाने रियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ती भायखळा कारागृहात तर, शौविक हा तळोजा कारागृहात होता. रिया आणि शौविक यांच्या वतीने त्यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते.

उच्च न्यायालयाने 10 ऑक्टोबरला रियाला जामीन मंजूर केला होता मात्र, शौविकचा जामीन फेटाळला होता. रियाला अटक झाल्यानंतर महिनाभराने तिची सुटका झाली होती. अखेर शौविक याला विशेष न्यायालयाने 2 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. सुमारे तीन महिन्यानंतर शौविकला जामीन मिळाला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com