मुंबईत स्वबळाचा नारा देत काँग्रेसचे 'मिशन शतक प्लस'

काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचबरोबर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
mumbai congress announces mission century plus for bmc election
mumbai congress announces mission century plus for bmc election

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली केली आहे. या निवडणुकीत  ग्रेसने महाआघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यासाठी मुंबई काँग्रेसने 'मिशन शतक प्लस'चे नियोजन आखले आहे. या मिशनअंतर्गंत काँग्रेस शंभर अथवा त्याहून अधिक उमेदवार निवडून आणणार आहे.

महापालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत काँग्रेसची सत्ता आणून महापौर बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी 'मिशन शतक प्लस' आखण्यात आले आहे. काँग्रेसचे 2017 मधील महापालिका निवडणुकीत 32 नगरसेवक निवडून आले आहेत; मात्र 30 उमेदवार 500 ते एक हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यामुळे या सर्वांची गोळाबेरीज करून कॉंग्रेसने या मिशनची आखणी केली आहे. 

गेल्या 20 वर्षांत काँग्रेसला 2007 मध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या 73 जागा निवडून आल्या होत्या. ही निवडणूक काँग्रेसने एकट्याने लढवली होती; मात्र 2017 मध्येही काँग्रेसने एकट्याने लढून 31 जागा मिळाल्या होत्या. हा काँग्रेससाठी सर्वांत पडता काळ होता, असे पक्षाचे नेतेच सांगतात. त्यामुळे आगामी निवडणूक एकट्याने लढल्यास पक्षाला नक्कीच फायदा होईल, तसेच कार्यकर्त्यांमध्येही विश्‍वास वाढेल, असा विश्‍वास नेते व्यक्त करीत आहेत. 

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नुकतीच निवड झाली. तेव्हापासून पक्षात मेळावे आणि बैठकांचे प्रमाण वाढले आहे. भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. ब्लॉक अध्यक्षांपासून विद्यमान आमदार, नगरसेवक आणि विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बैठका घेण्यात येत आहेत. 

काँग्रेसकडून प्रत्येक प्रभागातील माहिती जमा केली जात आहे. या माहितीच्या आधारावर झोपडपट्ट्यांना मोफत पाणीपुरवठा, पुनर्विकासाला पोषक धोरण अशा मुंबईतील महत्वाच्या मुद्‌द्‌यांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे समजते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com