सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यासारख्या भारतरत्नांची प्रतिष्ठा कशाला पणाला लावताय?

कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहानाने केलेल्या ट्विटला उत्तर दिल्यानंतर सचिन तेंडुलकरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यावरुन राज ठाकरेंनीकेंद्र सरकारला धारेवर धरले आहे.
mns chief raj thackeray slams modi government and bjp
mns chief raj thackeray slams modi government and bjp

नवी मुंबई : एखाद्या सरकारी धोरणासाठी केंद्र सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. सरकारने भारतरत्नांना अशाप्रकारे ट्विट करायला सांगणे चुकीचे आहे. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही कर्तृत्ववान माणसं आहेत पण साधी माणसं आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितलं म्हणून त्यांनी ट्विट केलं पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरं जावं लागतंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.  

कृषी कायद्यांना समर्थन करणारे ट्विट पॉप स्टार रिहानाने केले होते. यानंतर देशातील सेलिब्रेटींनी मैदानात उतरून सरकारची बाजू लावून धरली होती. यात माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा समावेश होता. यावरुन राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, रिहानाने एक ट्विट केलं तर सर्व आगपाखड करताहेत. हे  म्हणताहेत की हा आमच्या देशाचा प्रश्न आहे, तू नाक खुपसू नको. मग 'अगली बार ट्रम्प सरकार' म्हणत जाऊन भाषणं करायचीही गरज नव्हती, तोही त्यांच्या देशाचा प्रश्न होता. 

सरकारने आणलेला कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील, तर त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे. चीन-पाकिस्तानच्या सीमेवरही इतका कडेकोट बंदोबस्त नसेल इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची काहीही गरज नाही. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालून तो मिटवायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले. 

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे आज बेलापूर न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने या प्रकरणी त्यांनी वॉरंट बजावले होते. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. त्यांना या प्रकरणी पुढील न्यायालयीन हजर न राहण्याची मुभा देण्यात आली आहे. राज ठाकरे हे आज न्यायालयात हजर झाले. या निमित्तानं मनसेने नवी मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीच्या तोंडावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा मनसेला होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

वाशीमध्ये राज ठाकरे यांनी 26 जानेवारी 2014 रोजी भडकावणारे भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची बेलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट बजावले होते. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com