आशिष शेलारांना पाच लाख रुपये जमा करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश - hc asks ashish shelar to deposit Rs 5 lakh for filing PIL against BMC | Politics Marathi News - Sarkarnama

आशिष शेलारांना पाच लाख रुपये जमा करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

औषध खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधक औषधे खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारे भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या याचिकेची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली.  याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी शेलार यांनी पाच लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने शेलार यांना दिले.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधं आणि जंतुनाशके खरेदी करण्यासाठी  प्रशासनाने मागील वर्षी २१ ऑगस्ट रोजी निविदा प्रक्रिया राबविली होती. ही निविदा प्रक्रिया नियमानुसार नसून  जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य यंत्रणेच्या अटींशी छेद देणारी आहे असा आरोप शेलार यांनी केला आहे. 

ही बातमी वाचा : पंढरपूरच्या निवडणुकीत स्वाभिमानीची उडी

दर्जा नसल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे आणि कर्मचारी देखील बाधित होत आहे असे शेलार यांनी म्हटले आहे. यावर आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. शेलार यांनी निविदा प्रक्रिया नाकारलेल्या कंपनीच्या वतीने याचिका केली आहे, सर्व औषधे नियमानुसार झाली आहे, असा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला. तसेच याचिकेतील तथ्य तपासण्या साठी शेलार यांनी न्यायालयात विशिष्ट रक्कम जमा करायला हवी आणि मग सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली. खंडपीठाने याला सहमती दिली आणि शेलार यांनी पाच लाख रूपये तातडीने जमा करावे असे निर्देश दिले. महापालिकेच्या या निविदेवर स्थगिती आणावी आणि सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश सरकार आणि प्रशासनाला द्यावे अशी मागणी याचिकेत केली आहे.

ही बातमी पण वाचा : शिर्डीला जाण्यापूर्वी ही बातमी आवर्जून वाचा

ही बातमी वाचा : जळगावातील त्या नगरसेवकांचा फैसला गिरीश महाजनच करणार

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख