दहिसरमध्ये चौधरी-घोसाळकर वाद पेटला

एकेकाळी मित्र असलेल्या शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही.
Chaudhary-Ghosalkar dispute rises in dahisar ahead of corporation election
Chaudhary-Ghosalkar dispute rises in dahisar ahead of corporation election

मुंबई : दहिसरमध्ये वर्षभराने होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. एकेकाळी मित्र असलेल्या शिवसेना-भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत. 

दहिसर हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला होता. 2014 च्या निवडणुकीपर्यंत युती असली तरी मनाने या दोन्ही पक्षांचे नेते कधीच एकत्र आले नाहीत. मोदी लाटेमध्ये भाजपाने हा मतदारसंघा आपल्याकडे खेचून घेतला. घोसाळकर कुटुंबियांचे या मतदारसंघात वर्चस्व होते. कधी दरेकर बंधूंशी तर कधी भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्याशी त्यांची धुसफूस सुरूच होती. 

आता युती नसल्याने दोन्ही पक्षाचे नेते उघडपणे समोरासमोर उभे ठाकले आहेत. नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या गणपत पाटील नगरवासियांना वीज देण्याविरोधात असल्याचा आरोप करत आमदारांनी मोर्चाही काढला. तर त्याला घोसाळकर कुटुंबियांनी जाहीर प्रत्युत्तर दिले.

गणपत पाटील नगर या झोपडपट्टीत वीज, पाणी, स्वच्छतागृहे या सुविधा घोसाळकर यांनी दिल्या आहेत. उलट भाजपच्या लोकप्रतिनिधींनी येथे काहीही काम केले नाही, कोरोना काळात तर ते फिरकलेही नाहीत. केवळ शिवसेनाच येथील लोकांसाठी धावून आली, असा दावा करत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले. विविध सुविधांचे लोकार्पण तसेच एक कोटी रुपये खर्च करून महापालिका येथे बांधत असलेल्या दुमजली स्वच्छतागृहाचे भूमीपूजन नुकतेच झाले. यावेळी त्यांनी भाजप आमदारांनी जोरदार टीका केला.

भाजपकडे दाखविण्यासारखी विकासकामे नसल्याने ते शिवसेनेवर खोटे आरोप करीत आहेत. उलट किरकोळ सुविधांसाठी भाजप कार्यकर्तेच नागरिकांकडून हफ्ते घेत आहेत, असाही गंभीर आरोप घोसळकर यांनी यावेळी केला. तर भाजप नेत्यांपासून सावध राहण्याचा सल्ला माजी आमदार व म्हाडा चे सभापती विनोद घोसाळकर यांनी नागरिकांना दिला. गणपत पाटील नगरच्या विकासासाठी या विभागाला झोपडपट्टी घोषित करून सोयीसुविधा दिल्या जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

वर्षभराने महापालिका निवडणूक होणार असल्याने दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाहीत. राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी महापालिका निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येणार की नाही, हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे दहिसरमध्ये शिवसेनेसह भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com