भाजपच्या पदाधिकाऱ्याने केला स्वपक्षाच्याच नगरसेविकेचा विनयभंग

कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपच्या नगरसेविकेच्या पक्षाच्याच पदाधिकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
bjp office bearer sexually harasses woman corporator of kdmc
bjp office bearer sexually harasses woman corporator of kdmc

डोंबिवली :  कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेविकेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरसेविकेचा विनयभंग आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपचेच पदाधिकारी संजय चौधरी यांच्याविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौधरी यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, महापालिका निवडणुका जवळ आल्याने केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा असल्याचे म्हटले आहे. 

महापालिकेच्या वतीने चोळेगावात 29 सप्टेंबरला पाईपलाईनची गळती काढण्याचे काम सुरु होते. या कामाची पहाणी करण्यासाठी नगरसेविका पती आणि मुलासह तेथे गेल्या होत्या. यावेळी संजय चौधरी यांनी तेथे येऊन त्यांच्याशी अंगाशी लगट केली. तसेच, 2 ऑक्टोबरला सकाळी नगरसेविका पतीसह कामाची पहाणी करण्यास गेल्या होत्या. त्यावेळीही संजय चौधरी यांनी तेथे पोचले. त्यावेळी नगरसेविकेने तू इथे का आलास, अशी विचारणा केली. यावर संजय यांनी नगरसेविकेला कपाळमोक्ष करण्याची तसेच पतीला ठार मारण्याची धमकी दिली.

यामुळे नगरसेविकेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीवरुन रामनगर पोलिस ठाण्यात संजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी चौधरी यांना विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. केवळ बदनामीसाठी जाणीवपूर्वक खोटे आरोप केल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

हे ही वाचा : मत्स्य विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्तास लाच घेताना पकडले 

कोल्हापूर : नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल तक्रारदारांकडून दोन लाखांची लाच घेताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्त प्रदीप केशव सुर्वे (रा. कारंडेमळा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. विभागाच्या पथकाने लक्ष्मीपुरी परिसरात कारवाई केली. 

सुर्वे याच्याकडे कसबा बावडा येथील मस्त्य व्यवसाय कार्यालयात मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहायक आयुक्तपदाची जबाबदारी आहे. तक्रारदारांचा मत्स्य उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन जलाशय ठेके तत्त्वावर आहेत. सन 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या जलाशयातील मासे व मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या. 

यानंतर राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली होती. त्यानुसार तक्रारदारांच्या संस्थेच्या जलाशयांचे महसूल विभागामार्फत रितसर पंचनामे करण्यात आले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com