तू मला भेट, मी तुला पुरावे दाखवते...उर्मिला अन् कंगनामध्ये जुंपली

अभिनेत्री कंगना राणावतने आता उर्मिला मातोंडकर हिला लक्ष्य केले आहे. यावर उर्मिलाने कंगनाला थेट आव्हान दिले आहे.
actress urmila matondkar gave befitting reply to kangana ranaut
actress urmila matondkar gave befitting reply to kangana ranaut

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तब्बल तीन कोटी रुपयांचे ऑफीस मुंबईत खरेदी केले आहे. यावरुन अभिनेत्री कंगना राणावतने उर्मिलाला लक्ष्य केले आहे. यावर उर्मिलाने कंगनाला थेट आव्हान दिले आहे. यानंतर कंगनाने पुन्हा उर्मिलाची खोड काढत तिची टिंगलटवाळी करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे दोघींमधील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

कंगनाने नुकतीच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला लक्ष्य केले आहे. उर्मिला हिने तब्बल तीन कोटी रुपयांचे ऑफीस मुंबईत खरेदी केले आहे. यावर कंगनाने उर्मिलाला लक्ष्य केले आहे. तिने म्हटले आहे की, प्रिय उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीने बांधलेले घर काँग्रेसने तोडून टाकत आहे. खरंच, भाजला खूष करून माझ्या हातात 25 ते 30 खटल्यांशिवाय काहीच पडले नाही. मीही तुमच्याप्रमाणे समजदार असते तर काँग्रेसला खूष केले असते. मी किती मूर्ख आहे की नाही? 

याला आता उर्मिलाने प्रत्युत्तर दिले आहे. उर्मिलाने यासाठी गणपती बाप्पा मोरया म्हणत एक व्हिडीओच ट्विट केला आहे. तिने म्हटले आहे की, मला कंगनाने प्रत्यक्ष भेटावे. मी सुमारे 25 ते 30 वर्षे चित्रपट क्षेत्रात केलेल्या कष्टातून कमावलेल्या पैशातून ही मालमत्ता खरेदी केली आहे. याचे सर्व पुरावे मी तिला दाखवेन. याबाबतची सर्व कागदपत्रेही माझ्याकडे आहेत. मी घेतलेली मालमत्ता राजकारणात प्रवेश करण्याआधी घेतलेली आहे. 

यानंतर कंगनाने पुन्हा एकदा उर्मिलाला लक्ष्य केले आहे. उर्मिलाची टिंगलटवाळी करणारा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यात उर्मिलाला सॉप्ट पोर्नस्टार, राजकारणासाठी काहीही करणारी अशी विशेषणे वापरली आहेत. यावरुन आता दोघींमधील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात रोज जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कंगनाच्या वांद्र्यातील पाली हिल येथील बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावून बंगला सील केला होता. यातील बांधकामाबाबत कागदपत्रे सादर करण्यास महापालिकेने कंगनाला दिलेली २४ तासांची मुदत ९ सप्टेंबरला संपल्यानंतर महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. 

दरम्यान, खारमधील ऑर्किड ब्रीझ इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाचे तीन फ्लॅट आहेत. यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मुंबई महापालिकेने कंगनाला 2018 मध्ये नोटीस बजावली होती. या विरोधात कंगनाने दिंडोशी दिवाणी न्यायालयात 2019 मध्ये खटला दाखल केला होता. न्यायालयाने कंगनाचा खटला रद्दबातल ठरवत तिला उच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. यामुळे कंगनाचे दुसरे घरही अडचणीत आले आहे. 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com