अन् कंगना राणावतने दिली स्वत:च्याच मूर्खपणाची कबुली!

अभिनेत्री कंगना राणावतने आता उर्मिला मातोंडकर हिला लक्ष्य केले आहे. हे करताना तिने स्वत:च्याच मूर्खपणाची कबुली दिली आहे.
actress kangana ranaut targets shivsena leader urmila matondkar
actress kangana ranaut targets shivsena leader urmila matondkar

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तब्बल तीन कोटी रुपयांचे ऑफीस मुंबईत खरेदी केले आहे. यावरुन अभिनेत्री कंगना राणावतने उर्मिलाला लक्ष्य केले आहे. मात्र, हे करताना स्वत:च्याच मूर्खपणाची कबुलीही सोशल मीडियावर दिली आहे. मी सुद्धा भाजपला खूष करण्याऐवजी काँग्रेसला खूष करायला हवे होते, असा पश्चातापाचा सूरही कंगनाने आळवला आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात रोज जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

आता कंगनाने नुकतीच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला लक्ष्य केले आहे. उर्मिला हिने तब्बल तीन कोटी रुपयांचे ऑफीस मुंबईत खरेदी केले आहे. यावर कंगनाने उर्मिलाला लक्ष्य केले आहे. तिने म्हटले आहे की, प्रिय उर्मिलाजी मी स्वत:च्या मेहनतीने बांधलेले घर काँग्रेसने तोडून टाकत आहे. खरंच, भाजला खूष करून माझ्या हातात 25 ते 30 खटल्यांशिवाय काहीच पडले नाही. मीही तुमच्याप्रमाणे समजदार असते तर काँग्रेसला खूष केले असते. मी किती मूर्ख आहे की नाही? 

कंगनाच्या वांद्र्यातील पाली हिल येथील बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावून बंगला सील केला होता. यातील बांधकामाबाबत कागदपत्रे सादर करण्यास महापालिकेने कंगनाला दिलेली २४ तासांची मुदत ९ सप्टेंबरला संपल्यानंतर महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. 

दरम्यान, खारमधील ऑर्किड ब्रीझ इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाचे तीन फ्लॅट आहेत. यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मुंबई महापालिकेने कंगनाला 2018 मध्ये नोटीस बजावली होती. या विरोधात कंगनाने दिंडोशी दिवाणी न्यायालयात 2019 मध्ये खटला दाखल केला होता. न्यायालयाने कंगनाचा खटला रद्दबातल ठरवत तिला उच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. यामुळे कंगनाचे दुसरे घरही अडचणीत आले आहे. 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com