आझमींच्या वाढदिवसाची भव्य रॅली, फिरकविली तलवार, कोरोनाविषयक नियमांचे काय?

विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट दिली. ही तलवर हवेत फरवली. घोडा गाडीतून काढलेली मिरवणूक कोरोना विषयक नियमांची पायमल्ली करणारी ठरली.
azmi.jpg
azmi.jpg

मुंबई ः समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रॅली काढली. त्यामुळे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली झाली. मास्क न घालता हजारो कार्यकर्ते या वेळी हजर होते. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट दिली. ही तलवर हवेत फरवली. घोडा गाडीतून काढलेली मिरवणूक कोरोना विषयक नियमांची पायमल्ली करणारी ठरली. पोलिसांनी मात्र बघ्यांची भूमिका केली. (What about the grand rally of Azmi's birthday, the revolving sword, the rules about corona?)

नेत्यांनी असे करणे योग्य नाही

ते माझे चांगले मित्र आहेत. पण नेत्यांनी असे करणे दुर्दवी आहे. मीही त्यांना शुब्धेच्छा दिल्या. लोकप्रतिनिधींनी स्वतःची जबाबदारी समजून घ्यायला हवी. मी वरुण सरदेसाई यांच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहिले नाहीत. पण सगळ्यांना समान न्याय असायला पाहिजे यात वाद नाही, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली.

हेही वाचा..

हेही वाचा..

हे विद्यार्थीगृह शहराचे हेरीटेज

नगर : शतकोत्तर वर्षापासून जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान हिंद सेवा मंडळाने दिले आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण देवून घडवले आहे. संस्थेच्या रामकरण सारडा विद्यार्थी गृहामधूनही अनेक गोर गरीब व गरजू  विद्यार्थी आज उच्च पदस्थ झाली आहेत. १०७ वर्षाची ही संस्था शहराची हेरीटेज संस्था आहे. अशा चांगले काम करणाऱ्या संस्थेच्या मागे मी खंबीरपणे उभा असून, सर्व स्तरावर सहकार्य करत आहे. रामकरण सारडा विद्यार्थी गृहाच्या नूतन वास्तुचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधार असणार आहे. या वास्तुमुळे शहरातील शैक्षणिक वैभवात भर पडणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा विद्यार्थी गृहाच्या स्थापनेस१०७ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत उभारलेल्या नूतन भव्य वस्तूचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले.

श्रीरामपुरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यावेळी प्रमुख पाहुण्या होत्या. विद्यार्थीगृहाच्या जडणघडनीत भरीव योगदान देणारे शामसुंदर सारडा कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, की सर्व सर्वसामान्यांना शिक्षणासाठी गेल्या १०७ वर्षापासून भरीव योगदान हिंद सेवा मंडळ ही संस्था देत आहे. संस्थेचे विद्यार्थी घडवण्याचे कार्य अलौकिक आहे. शिक्षण सेवेचे काम प्रामाणिकपणे करत असल्यानेच दानशूर विश्वासाने संस्थेच्या मागे उभी आहेत. श्रीरामपुरच्या शाळांना सर्वतोपरी सहकार्य मी करणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com