ईडीची नोटीस आली अन् संजय राऊत म्हणाले, घरी जाऊन बघावे लागेल..!

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली आहे. यामुळे भाजपने राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी लावली जात असल्याचा आरोप होत आहे.
shivsena leader sanjay raut will clear his stand on ed notice
shivsena leader sanjay raut will clear his stand on ed notice

मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस आली आहे. त्यांना चौकशीसाठी 29 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पीएमसी बँक गैरव्यहारप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबद्दल माहिती नसल्याचे म्हटले आहे. याविषयी पत्रकार परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले. हे व्यवहार कसे  झाले आणि त्यामागील कारण काय याची चौकशी ईडी करणार आहे. वर्षा राऊत यासाठी ईडीने बोलावले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेला प्रतिज्ञापत्रही याचा उल्लेख केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

शिवसेना नेते व आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकून  सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरुन शिवसेना नेते भाजपवर चांगलेच संतापले होते. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावली होती. 

ईडीची नोटीस आल्याच्या वृत्तावर एका वृत्तवाहिनीने संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली. यावर राऊत म्हणाले की, ईडीची नोटीस आली आहे की नाही याबद्दल मला नेमकी माहिती नाही. मी बाहेर आता एका कार्यक्रमात आहे. मला घरी जाऊन पाहावे लागेल की नोटीस आली आहे की नाही. याबद्दल मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडेन. 
काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी मोठा दावा केला होता.

महाआघाडीतील नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली जात असल्याचा आरोप होत आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, की कोणती चौकशी कोण, कुठे, कशी लावत आहे, हे काही कळत नाही. एक मात्र खरे की, सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे. आज ना उद्या चौकशी होणारच. त्यामुळे त्याचाही सामना संपूर्ण ताकदीनिशी करण्यात येईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com