पप्पू कलानी पुन्हा पॅरोलवर उल्हासनगरात.. राजकीय जुळवाजुळवीसाठी महालावर गर्दी वाढली...

उल्हासनगरात कलानींचीच चलती...
Pappu Kalani-omi kalani.
Pappu Kalani-omi kalani.

उल्हासनगर ः मागच्या महिन्यात ज्योती कलानी यांच्या निधनाच्या निमित्ताने १४ दिवसांच्या पॅरोलवर आलेले पप्पू कलानी (Pappu Kalani) यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आता कोरोनामुळे त्यांची ४५ दिवस अर्थात दीड महिन्यांसाठी पॅरोलवर सुटका झाली आहे. त्यामुळे जुन्या समर्थकांचे दुरावलेले हितसंबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित करून येणाऱ्या पालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणे बदलण्याचे प्रयत्न पप्पू कलानी करण्याची शक्यता आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pappu Kalani may knot new political equations in Ulhasnagar)

पप्पू कलानी हे २०१३ पासून इंदर बठीजा हत्याकांड प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी त्यांनी रिक्षा युनियन नेते मारुती जाधव हत्याप्रकरणी ९ वर्षे कारागृहात काढली होती. २००१ मध्ये त्यांना जामीन मिळताच उल्हासनगरात ‘केर आयो पप्पू शेर आयो’ हे गाणे गाजले होते. तेव्हा २००२ च्या पालिका निवडणुकीत पप्पू कलानी यांनी राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. तुरुंगामधून निवडून येण्याची हॅटट्रिकदेखील पप्पू कलानी यांच्याच नावावर आहे. उल्हासनगर म्हटले की पप्पू कलानी असे समीकरण बनले आहे. कलानींची गुन्हेगारी पार्श्वभूमी वगळता शहराचा विकास हे त्यामागील कारण असून आजही कलानींच्या काळात ३० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले सिमेंट काँक्रीटचे रोड सुस्थितीत दिसत आहेत.

ओमी कलानी कोणासोबत?
दरम्यान, पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याची ‘टीम ओमी कलानी (टीओके)’ महाविकास आघाडीसोबत आहे. मागच्या वर्षी भाजपासोबत सत्तेत असलेल्या ओमीने, भाजपने विधानसभेत तिकीट नाकारल्याने महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करून महापौर निवडणुकीत वचपा काढला होता. त्यामुळेच भाजपला अवघ्या अडीच वर्षांतच सत्ताउतार व्हावे लागले होते. आता पप्पू कलानी दीड महिन्यांकरिता शहरात असून ते पुन्हा राष्ट्रवादीशी जवळिक साधतात की, महाविकास आघाडीसोबत राहण्यासाठी ओमीला सूचना देतात, हा चर्चेचा विषय बनला आहे. कलानी पॅरोलवर आल्याने त्यांना भेटण्यासाठी हितचिंतक, विविध राजकीय पक्षाचे नेते, नगरसेवक कलानी महालावर गर्दी करू लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com