विरारमध्ये रिसॉर्टमधील छम छमवर पोलिसांचा छापा; १५ बारबालांना अटक

पोलिस निरिक्षक सुरेश वराडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, विरारमधील मॉस रिसॉर्टमध्ये बारबालांच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही छापा मारला. त्यावेळी १५ बारबालांसह १६ ग्राहकांना आम्ही ताब्यात घेतले
विरारमध्ये रिसॉर्टमधील छम छमवर पोलिसांचा छापा; १५ बारबालांना अटक
Police raid on a resort in Virar; 15 Barbalas arrested

विरार : विरारमधील एका रिसॉर्टमध्ये बारबालांचा छम छम डान्स सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी गुरूवारी रात्री या रिसॉर्टवर छापा टाकून  १५ बारबालांसह १६ ग्राहकांना अटक केली. घटनास्थळावरून दोन लाख ३० हजारांची रोकड व विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. Police raid on a resort in Virar; 15 Barbalas arrested

विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी परिसरातील चांदीप येथील मॉस या रिसॉर्ट बारवर गुरुवारी रात्री बारबालांचा छम-छम डान्स सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी रिसॉर्टवर छापा टाकला. यावेळी बारबालांचा छमछम नाच होत असल्याचे निदर्शनास आले. 

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६ ग्राहकांसह १५ बारबालांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. आज शुक्रवारी या सर्व आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या छाप्यामध्ये दोन लाख 30 हजार रूपयांची रोकड व विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे.

यासंदर्भात विरार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुरेश वराडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, विरारमधील मॉस रिसॉर्टमध्ये बारबालांच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही छापा मारला. त्यावेळी १५ बारबालांसह १६ ग्राहकांना आम्ही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन लाख ३० हजारांची रोकड व विदेशी दारू जप्त केली आहे. 

Related Stories

No stories found.