पालघर झेडपी, पं.स. : आरक्षणाचा फटका बसलेले सर्व उमेदवार पोटनिवडणूक लढवणार?

राज्यात महाविकास आघाडी आणि जिल्हा परिषदेमध्येही तीच आघाडी असली तरी आताचे चित्र बदलले असल्याने सर्वच पक्ष आपले बलाबल अजमावणार असल्याचे चित्र दिसत असून या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
पालघर झेडपी, पं.स. : आरक्षणाचा फटका बसलेले सर्व उमेदवार पोटनिवडणूक लढवणार?
Palghar ZP, P.S. : All the candidates affected by reservation will contest by-elections?

पालघर : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 29 सदस्यांना ओबीसी आरक्षणाचा फटका बसला होता. आता हे सर्व उमेदवार सर्वसाधारण मधून निवडणूका लढविणार असल्याचे संकेत मिळत असल्याने जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा तेच चेहरे दिसणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील पंधरा सदस्य आणि पालघर डहाणू वाडा आणि वसई या चार पंचायत समितीमधील 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. Palghar ZP, P.S. : All the candidates affected by reservation will contest by-elections?

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या17 सदस्यांपैकी 8 शिवसेनेच्या 18 सदस्यांपैकी 3 भारतीय जनता पक्षाच्या 12 सदस्यांपैकी तीन, माकपाच्या पाच सदस्यांपैकी एक सदस्य अशा एकूण 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते

जिल्हा परिषद सदस्य रद्द झालेले तलासरी तालुक्यातील उधवा गटातून निवडून आलेले प्रवीण दवणे (सीपीएम). डहाणू तालुक्यातील बोर्डी गटातून निवडून आलेल्या ज्योती पाटील .(राष्ट्रवादी ) कासा गटातून निवडून आलेल्या जयश्री केणी. (राष्ट्रवादी ),सरावली गटातून निवडून आलेल्या सुनील माच्छी (भाजपा) व नई, गटातून निवडून आलेले सुशील चुरी ( शिवसेना ), विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गटातून निवडून आलेले निलेश सांबरे (अपक्ष राष्ट्रवादी ). 

मोखाडा तालुक्यातील आसे गटातून हबीब शेख (राष्ट्रवादी), पोशेरा गटातून निवडून आलेल्या राखी चौथे (भाजपा ), वाडा तालुक्यातील गा रगाव गटातून निवडून आलेल्या रोहिणी शेलार (राष्ट्रवादी), मोज गटातून निवडून आलेल्या अनुष्का ठाकरे (शिवसेना), मांडा गटातून निवडून आलेल्या अक्षता चौधरी (राष्ट्रवादी).

पाल सई गटातून निवडून आलेले शशिकांत पाटील (राष्ट्रवादी), अबिटघर गटातून निवडून आलेले नरेश साखरे (राष्ट्रवादी), पालघर मधील सावरे - एम्बुर गटातून निवडून आलेल्या विनया पाटील (शिवसेना), नंडोरे - देवखोप गटातून निवडून आलेल्या अनुश्री पाटील (भाजपा ) अशा पंधरा सदस्यांना आरक्षणाचा फटका बसला होता.

राज्यात महाविकास आघाडी आणि जिल्हा परिषदेमध्येही तीच आघाडी असली तरी आताचे चित्र बदलले असल्याने सर्वच पक्ष आपले बलाबल अजमावणार असल्याचे चित्र दिसत असून या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in