आमदार सांगतात KDMC चा अर्थ ट्विटरवर; महापालिकेच्या नावाची नवीन व्याख्येचीच चर्चा - MLAs say KDMC means on Twitter; Discussion of the new definition of the name of the corporation - ub73 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

आमदार सांगतात KDMC चा अर्थ ट्विटरवर; महापालिकेच्या नावाची नवीन व्याख्येचीच चर्चा

शर्मिला वाळुंज
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

केडीएमसी आमदार पाटील यांनी केलेली ही नवीन व्याख्या अगदी तंतोतंत जुळल्याने नागरिकांनी रिट्विट करत हा मुद्दा चर्चित आणला आहे. रिट्विट करताना शहरातील खराब रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी चे फोटो, व्हिडीओ नागरिकांनी व्हायरल केले आहेत.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि त्यावरचे खड्डे कोणालाच नवीन नाहीत. या खड्ड्यांवरून निवडणुकाही लढल्या गेल्या आणि आंदोलनेही झाली. स्मार्ट सिटीचे स्वप्न कल्याण डोंबिवलीकरांना आता दाखविले जात आहे. मात्र हे शहर कधी सुधारेल का? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडतो. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी KDMC ची नवीन व्याख्या ट्विट करीत नागरिकांच्या मनातील खदखदच जणू त्यातून व्यक्त केली आहे. त्यांचे ते ट्विट केडीएमसीला रिट्विट करत अनेकांनी पालिकेचे रस्ते, वाहतूक कोंडी या समस्येला ट्विटरवर वाचा फोडली आहे. MLAs say KDMC means on Twitter; Discussion of the new definition of the name of the corporation - ub73

कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच किडीएमसी हा शॉर्ट फॉर्म आपल्याला माहीतच आहे. मात्र, शहरातील रस्ते, खड्डे, चिखल पाहता आता केडीएमसीची नवीन व्याख्या ट्विटवर चांगलीच चर्चेत आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी एक ट्विट केले. त्यात पाटील यांनी केडीएमसीची नवीन व्याख्या शोधून काढली. KDMC म्हणजे …..! K - Khadde ( खड्डे ) D - Dagad ( दगड ) M- Maati ( माती ) C - Chikhal ( चिखल ) अशी व्याख्या त्यांनी केली असून ती पालिका प्रशासनाला ट्विट केली आहे.

हेही वाचा : इम्तियाज जलील यांनी आगाऊपणा करू नये; खैरेंचा इशारा..

 यासोबतच त्यांनी स्मार्ट सिटी विकासाचे काम प्रगती पथावर आहे असा संदेश असलेला पालिकेचा फोटो आणि त्याच बाजूला खड्यामुळे रस्त्याची चाळण झालेला रस्ता हा बोलका फोटो देखील ट्विट केला आहे. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कल्याण डोंबिवलीकरांना हे शहर कधी स्मार्ट सिटी होईल, यावर विश्वास बसत नाही. कोट्यवधी रुपये ओतले तरी हे शहर असेच राहणार असा त्यांना विश्वास असून तो सार्थ करण्यासाठी महापालिकेतील सर्वच जण जणू सरसावलेले असतात.

आवश्य वाचा : सभापती पदी शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे तर उपसभापती पदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड जाहीर

दरवर्षी पावसाळा येण्याआधी रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजवून नागरिकांची तोंड गप्प करण्याची पालिकेची सवय आता नवीन राहिलेली नाही. सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील ही सारी खदखद आहे. त्यात केडीएमसी आमदार पाटील यांनी केलेली ही नवीन व्याख्या अगदी तंतोतंत जुळल्याने नागरिकांनी रिट्विट करत हा मुद्दा चर्चित आणला आहे. रिट्विट करताना शहरातील खराब रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी चे फोटो, व्हिडीओ नागरिकांनी व्हायरल केले आहेत. आता तरी सत्ताधारी, पालिका प्रशासन यातून बोध घेत रस्त्यांची कामे नीट करणार का? हे पहावे लागेल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख