नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या मोटारीला वाशी टोलनाक्यावर अपघात

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोटारीला वाशी टोल नाक्यावर अपघात घडला. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
minister eknath shinde motor met with accident near vashi toll plaza
minister eknath shinde motor met with accident near vashi toll plaza

नवी मुंबई : वाशीहून मुंबईच्या दिशेने जात असताना वाशी टोल नाक्यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोटारीला अपघात झाला. यात एकनाथ शिंदे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून, ते सुखरूप असल्याची माहिती आहे. 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे काल (ता.24)  नवी मुंबई येथील कार्यक्रम संपवून वाशीमार्गे मुंबईला जात होते. त्यावेळी वाशी टोल नाका येथे दोन वाहनांचा अपघात झाला होता. त्याच रस्त्याने शिंदे यांच्या वाहनांचा ताफा जात होता. दरम्यान, त्यांच्या ताफ्यातील पुढील दोन वाहनांनी अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणारी एकनाथ शिंदे यांची मोटार पुढील वाहनावर आदळली. या धडकेत एकनाथ शिंदे यांच्या हाताला किरकोळ मार लागला. ते सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी झाला होता जादूटोण्याचा प्रकार  

एकनाथ शिंदे यांच्या जिवास धोका व्हावा यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले होते. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे तलावली येथून अटक केली होती.

कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जिवाला धोका व्हावा, अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्यासाठी अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. 

शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com