खेलो मास्टर्स गेम फाउंडेशनच्या राज्याध्यक्षपदी क्षितिज ठाकूर यांची निवड 

सध्या पालघर जिल्ह्यातून अनेक क्रीडा प्रकारात खेळाडू पुढे येत आहेत. त्यांना ठाकूर यांच्या नेमणुकीने मदतीचा हात मिळणार असल्याचे बोलले जात आहे.​
खेलो मास्टर्स गेम फाउंडेशनच्या राज्याध्यक्षपदी क्षितिज ठाकूर यांची निवड 
Kshitij Thakur elected as State President of Khelo Masters Game Foundation

विरार : नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांची खेलो मास्टर्स गेम फौंडेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र आज फाउंडेशनचे सचिव शैलेंद्र सिंग यांनी ठाकूर यांना पाठवले आहे. गेल्या काही वर्षांपासून क्षितिज ठाकूर हे वसई तालुका कला क्रीडा महोत्सव, महापौर मॅरॅथॉन आणि पालघर जिल्हाच्या अनेक संघटनांवर काम करत आहेत. Kshitij Thakur elected as State President of Khelo Masters Game Foundation

क्षितिज ठाकूर यांच्या बरोबर सरचिटणीस म्हणून चिंचणी येथील अमन चौधरी आणि खजिनदारपदी सुनील हामंद यांची निवड पुणे येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला राज्यातून ३० जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील खेलो मास्टर्स गेम फाउंडेशन पुढे आले आहे. 

या अंतर्गत १६ क्रीडा प्रकारात ते काम करत आहेत. त्यात ॲथलेटिक्स, बॉस्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, हॅण्डबॉल, कबड्डी, लॉन टेनिस, नेटबॉल, स्विमिंग, शूटिंग, शुकबॉल, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, व्हरेस्टीग या खेळांचा समावेश आहे. 

या खेळामध्ये पुढे येणाऱ्या खेळाडूंना मदत करण्याचे ध्येय फाउंडेशनने ठेवले आहे. क्षितिज ठाकूर यांच्यामुळे फाउंडेशनच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याला मिळाला आहे. सध्या पालघर जिल्ह्यातून अनेक क्रीडा प्रकारात खेळाडू पुढे येत आहेत. त्यांना ठाकूर यांच्या नेमणुकीने मदतीचा हात मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in