वसई विरारमध्ये निवडणूकांच्या तोंडवर मुख्यमंत्र्यांकडून जुन्या कामांचीच उद्घाटने.....

प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारने वसई-विरार शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन कार्यक्रमे करून जनतेची फसवणूक केली जात आहे, असा आरोप आमदार डावखरे यांनी केला आहे.
Inauguration of old works by the Chief Minister in the face of elections in Vasai Virar .....
Inauguration of old works by the Chief Minister in the face of elections in Vasai Virar .....

विरार : पालघर जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन आणि वसई विरार मधील विविध कामाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर आता यातील वसई विरारच्या लोकार्पण सोळ्यावरून आरोपाच्या फैरी झाडू लागल्या आहेत. यामध्ये भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी उडी घेतली असून त्यांनी वसई-विरार महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जुन्या कामांची वा पूर्ण झालेल्या कामांची
 उद्घाटने केली जात आहेत, असा आरोप केल्याने वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसत आहे. Inauguration of old works by the Chief Minister in the face of elections in Vasai Virar .....

भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी लोकार्पण सोहळ्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून त्यांनी त्यात वसई-विरार महापालिका हद्दीतील मच्छी मार्केट, ऑक्सिजन सेंटर, रस्ता आदींची उद्घाटने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून काल ऑनलाईनद्वारे करण्यात आली. मात्र, ही सर्व कामे जुनी आहेत. केवळ कार्यक्रम करण्यासाठी जुन्या कामांचीच उद्घाटने करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. 

वसईत सुमारे आठ वर्षांपूर्वी मच्छी मार्केट उभारले होते. या जुन्या मच्छी मार्केटचेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी  पुन्हा उद्घाटन केले. या मार्केटच्या आवारात 6 ते 7 महिन्यांपूर्वी ऑक्सिजन सेंटर उभारले होते. मात्र, आता कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्याचे उद्घाटन केले जात आहे. साधारणत: मोठ्या प्रकल्प वा मोठ्या रस्त्यांचे मुख्यमंत्री वा बड्या नेत्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाते. मात्र, वसई-विरारमध्ये अवघ्या 15 ते 30 मीटर रूंदीच्या रस्त्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. 

आवश्य वाचा : मी कुणाला नमस्कार करायचा हा माझा प्रश्न! राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर
 
त्यातील अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे दीड किलोमीटरचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, तो रस्ताही आज लोकार्पण करण्यात आला. विकासाचा पोकळ आभास करून जनतेची फसवणूक केली जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून वसई-विरारमध्ये विकासकामे केल्याचा पोकळ आभास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारने वसई-विरार शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन कार्यक्रमे करून जनतेची फसवणूक केली जात आहे, असा आरोप आमदार डावखरे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com