नितीन राउतांच्या विमान प्रवास खर्चाचा हिशोब द्या : न्यायालयाचा आदेश - give account for nitin rauts air travel expences court order | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नितीन राउतांच्या विमान प्रवास खर्चाचा हिशोब द्या : न्यायालयाचा आदेश

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

राऊत यांनी या विमान प्रवासाचे कारण देताना महत्त्वाची सरकारी कामे असे दिले आहे; मात्र प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही विभागीय किंवा शासकीय कामासाठी प्रवास केला नव्हता, असा दावा पाठक यांनी केला आहे.

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत Energy Minister Nitin Raut यांनी मागील वर्षी सरकारी खर्चातून केलेल्या विमान प्रवासांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court राऊत यांना आज दिले. राऊत यांनी व्यक्तिगत कामांसाठी हा प्रवास केला होता, असा आरोप याचिकेद्वारे केला आहे. भाजपचे नेते विश्वास पाठक BJP Leader Vishwas Pathak यांनी राऊत यांच्याविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. 

माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या तपशिलानुसार राऊत यांनी सरकारी कामे असल्याचे भासवून खासगी कामांसाठी विमान प्रवास केला आहे. या प्रवासासाठी त्यांनी सरकारी तिजोरीतून खर्च केला आहे, अशी माहिती विविध विभागांमार्फत मिळाल्याचा दावा याचिकेत केला आहे. याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राऊत यांच्या खासगी विमान प्रवासाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, अशी मागणीही पाठक यांनी केली आहे. 

राऊत यांनी या विमान प्रवासाचे कारण देताना महत्त्वाची सरकारी कामे असे दिले आहे; मात्र प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही विभागीय किंवा शासकीय कामासाठी प्रवास केला नव्हता, असा दावा पाठक यांनी केला आहे. राज्य सरकारने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्य़ांवर २८ जुलैपर्यंत सविस्तर खुलासा करावा, या मुद्द्य़ांची माहिती राऊत यांना द्यावी आणि भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. राऊत, राज्य सरकार, वीज मंडळ या प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. राऊत यांनी यापूर्वी या आरोपांचे खंडन केले आहे.

हेही वाचा : कॉंग्रेसने आधी आपली भांडणे संपवावीत, मग आम्ही ठरवू; राष्ट्रवादीचा टोला...

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा सरकारी खर्चातून खासगी कामासाठी विमान प्रवास चांगलाच चर्चेत आला होता. तेव्हा राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. तेव्हाही राऊत यांनी स्पष्टीकरण न देता आपल्यावरील आरोप खोडून काढले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विश्‍वास पाठक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त आदेश दिला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख