Exclusive मुंबई पोलिसांनंतर ठाण्यात होमगार्ड डीजी परमबिरसिंहच्या विरोधात गुन्हा दाखल…

हितेश शाह यांनी २०१८ साली पोलिसांत तक्रार नोंदवली होती की, त्याच्याकडून केतन, सोनू आणि मुनीर यांनी ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने आरोपींनी २२ जनवरी २०१८ ला त्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले.
Parambir Sing
Parambir Sing

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंह Former police commissioner of Mumbai Parambirsingh यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख former home minister of the state anil deshmukh यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर स्वतः परमबिरसिंह स्वतःसुद्धा अडचणींच्या गर्तेत गटांगळ्या खाऊ लागले. या प्रकरणात यापूर्वी मुंबई पोलिसांवर ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता परमबिरसिंह यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणात आता अंडरवर्ल्डची लिंक पुढे आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपींनी गैंगस्टर रवी पुजारी याचा वापर केल्याचा आरोप होत आहे. जेणे करून तक्रारदार सोनू जलान, केतन तन्ना आणि मुनीर पठाण यांना अडकवण्यासाठी आणि त्याच्याजवळून पैसे उकळता येईल. या प्रकरणात परमबिरसिंह यांचा पाय आणखी खोलात जात आहे. तपास जसजसा पुढे जाईल, तसतशा त्याच्या अडचणीत वाढ होत जाईल, असेही सूत्र सांगतात.  

नेमकं काय आहे प्रकरण
हितेश शाह यांनी २०१८ साली पोलिसांत तक्रार नोंदवली होती की, त्याच्याकडून केतन, सोनू आणि मुनीर यांनी ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने आरोपींनी २२ जनवरी २०१८ ला त्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले. या घटनेनंतर पोलिसांनी शाह याच्या सांगण्यानुसार आरोपीवर अटकेची कारवाई केली. ज्या दिवशी अपहरण केल्याचे सांगण्यात आले, त्या दिवशी दोन आरोपी केतन व मुनीर हे भारताबाहेर होते. तर सोनू हा मालाडच्या घरी असल्याचं बोललं जातं. याच आधारावर न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. 
 

मात्र आता नवा आरोप सोनू जलान यांच्याकडून करण्यात आला आहे की; ही तक्रारच खोटी होती. सोनुच्या म्हणण्यानुसार कुख्यात गुंड रवी पुजारीशी माझा काही संबंध नसल्याचं सोनू जालानचं म्हणणं आहे. तसेच रवीने केलेल्या धमकीचा फोन हा आम्हाला अडकवण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी असल्याचं त्याचं म्हणणं आहे. रवीने दिलेल्या या धमकीची रेकॉर्डिंग हाती लागली आहे. ही रेकाँर्डिंग खरी असल्याची खातर जमा करण्याचे काम सुरू असल्याचीही माहिती आहे. आरोपांच्या आधारावर CID ने तपास केला. आता ठाणे पोलिसांनी  परमबिर सिंह, हितेश शहा, रवी पुजारीसह इतरांवर गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.


Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com