चकमकफेम पोलिस निरीक्षक दया नायक एटीएस मध्येच राहणार, गोंदिया बदली रद्द..

दया यांनी मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून तपास करत वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्याच्या सहआरोपींचा पर्दाफाश करण्यात मोठी कामगिरी बजावली होती.
Daya Nayak
Daya Nayak

नागपूर : चकमकफेम पोलिस अधिकारी दया नायक यांची दहशतवादी विरोधी पथकातून (ATS, Daya Nayak) बदली करण्यात आली होती. त्यांना थेट गोंदिया जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. या बदलीच्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने त्यांना दिलासा दिला असल्याची खात्रीशिर माहिती आहे. 

मॅटने दया नायक यांच्या गोंदिया येथील बदलीच्या निर्णयाला स्थगिती दिली असून त्यांना मुंबई  एटीएस येथेच कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय कारणास्तव ही बदली केली गेली असल्याचे त्यांच्या बदली आदेशात नमूद करण्यात आले होते. (PI Daya Nayak transfers to Gondia). त्यानंतर पोलिस दलात विविध चर्चांना उधाण आले होते.  

दया यांनी मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून तपास करत वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्याच्या सहआरोपींचा पर्दाफाश करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. (Sachin Waze) मात्र  हे प्रकरण एनआयएकडे (NIA investigating Mansukh Hiren Murder case) एटीसएसचा तपास थांबला होता. 

दया नायक मुंबईच्या पोलिस वर्तुळातील नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मुंबई पोलिस दलात 1995 मध्ये दाखल झालेल्या नायक यांनी अनेक गुंडांना चकमकीत ठार मारले. त्यांच्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झाले होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कारवाई केली होती. दया नायक यांनी त्यांच्या कर्नाटकातील मूळ गावी शाळा सुरू केली असून त्या शाळेचे उदघाटन बिग बी अमिताभ बच्चन यांनी केले होते. या वेळी एम. एफ. हुसेन, सुनील शेट्टी, अफताब शिवदासानी असे सेलिब्रिटी उपस्थित होते. लालचुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनंतर नायक यांना तुरुंगात जावे लागले होते. तसेच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अपसंपदा कमवण्याचा आरोप झाला होता.

साऱ्या प्रकरणांचा न्यायालयीन निपटारा झाल्यानंतर त्यांना पुन्हा 16 जून 2012 रोजी पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यानंतर त्यांची बदली जानेवारी 2014 मध्ये नागपूर येथे करण्यात आली. पण ते तेथे रूजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांना जुलै 2015 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांची नागपूरची बदली रद्द करण्यात आली. त्यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात 11 जानेवारी 2016 मध्ये रुजू करून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना एटीएसमध्ये नियुक्ती देण्यात आली होती. नागपूरला न गेलेले नायक हे गोंदियातही जाणार नाही, असे तेव्हाच बोलले जात होते आणि घडलेही त्यानुसारच. अखेर मॅटने त्यांची गोंदिया बदली रद्द केली आणि त्यांना मंबई शहर एटीएसमध्ये सेवा पूर्ववत करण्यास सांगितले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com