काँग्रेसमधील गटबाजीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर आले आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते माजी आमदार अशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

मुंबई : काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या गटबाजीवर विरोधकांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadanvis  म्हणतात की, यशोमती ठाकूर Yashomati Thakur म्हणतात, अजित पवार Ajit Pawar ऐकत नाही. काँग्रेसचेच नेते स्वत:च्या आमदाराचा राजीनामा मागत आहेत. यावरून हे सरकार गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटलेले असतात. त्या प्रमाणे चिकटलेले आहेत. विरोधी पक्षासह सर्वच कॉंग्रेसवर टिका करू लागले आहे. 

एकीकडे कोंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मंत्री सुनील केदार यांचा राजीनामा घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप महापारेषण कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास त्याच्याच पक्षा़चे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे राजीनामा मागू, अशी भाषा करत असल्याने काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण पून्हा एकदा समोर आले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर आले आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस नेते माजी आमदार अशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. 

सुनिल केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये बॅंकेचे पैसे गुंतवल्याचा गंभीर आरोप आशीष देशमुख यांनी केला आहे. मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि जनसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता. आज १९ वर्ष झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली, असे पत्रच आशिष देशमुख यांनी सोशल मिडियावर पोस्ट केलं आहे.

महापारेषण कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यांसाठी मंत्र्यांची भेट घेऊनसुद्धा कामे होत नसल्याने भाई जगतापांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत महापारेषण कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झूम द्वारे दोन बैठका झाल्या. मात्र मंत्र्याचं प्रशासन ऐकत नाही, म्हणजे प्रशासन माजलेलं आहे. कामात आडमुठेपणा आणत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मंत्र्यांना असताना ते जर काही करत नसतील. तर त्यांच्याकडे राजीनामा आम्ही मागू, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षआमदार भाऊ जगताप यांनी म्हटले आहे. राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अंतर्गत गटबाजीमुळे मोठा फटका बसू शकतो, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com