सुशांतसिंह प्रकरणात मविआ अस्थिर करण्याचा भाजपचा डाव होता...

भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला.
sarkarnama banner
sarkarnama banner

मुंबई : सीबीआयने बिहार पोलिसांकडून Bihar Police सुशांतसिंह राजपुतच्या Sushantsingh Rajput दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेण्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १७७ कलमाचे उल्लंघन केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा राजकीय डाव होता, BJP instinct was to destabilize mahavikas alliance in sushantsingh case असे कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले. Sachin Sawant. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, एम्स पॅनेलने हत्येला नकार देऊन आता 300 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय अजूनही मुद्दाम मौन बाळगत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या मृत्यूच्या तपासाच्या या चेष्टेतून मोदी सरकारकडून या यंत्रणांचा राजकीय अजेंड्यासाठी कसा वापर केला जात आहे, हे स्पष्ट होते. भाजपने या प्रकरणात महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली. त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे.

गुप्तेश्वर पांडेचा वापर याकरिता केला गेला. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला. मविआ सरकारवरील या सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनीती अशी होती. भाजप संचालित वाहिन्यांना खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत होते. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार केले व त्या माध्यमातून अपप्रचार केल्याचा आरोप सावंत यांनी केला. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. सुशांतसिंह राजपूत हा खरा राजपूत नव्हता, असे धक्कादायक विधान राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) आमदार अरुण यादव यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी बोलतो म्हणून राग मानून घेऊ नका. सुशांत हा खरा राजपूत नव्हता. कारण, महाराणा प्रताप यांचा वंशज आत्महत्या करू शकत नाही. त्याने आत्महत्या करायला नको होती. याबद्दल आम्हाला दु:ख आहे. तो राजपूत होता तर त्याने परत लढायला हवे होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरही चांगलेच वादळ उठले होते. 
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com