Mumbai-Nagpur Samrudhi expressway | Sarkarnama

"समृद्धी'चा मार्ग खडतर ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेल्या समृद्धी सुपर एक्‍स्प्रेस हायवेच्या मार्गातील काटे दूर होण्याऐवजी ते अधिक टोकदार होत आहे. या अडचणींमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेल्या समृद्धी सुपर एक्‍स्प्रेस हायवेच्या मार्गातील काटे दूर होण्याऐवजी ते अधिक टोकदार होत आहे. या अडचणींमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

नागपूरहून मुंबईला जाणारा हा मार्ग राज्यातील 18 जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूरहून कमीत-कमी वेळेत मुंबईला पोचण्यासाठी हा मार्ग राहणार असून या रस्त्याला लागून टाऊनशिप विकसित केली आहे. यासाठी लागणाऱ्या जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची जमीन भूमी अधिग्रहण कायद्यानुसार न घेता लॅंड पुलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक येथील शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला. या विरोधाचे लोण आता विदर्भातही पोचले आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन देण्यास विरोध केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या जनसुनावणीत शेतकऱ्यांनी जमीन देण्यास ठाम विरोध केला. या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. 

या प्रकल्पाला आता शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला आहे. या प्रकल्पावर खर्च होणारी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरावी, अशी सूचना सेना आमदारांनी केली आहे. सेनेच्या या भूमिकेमुळे आता या प्रकल्पाचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख