मुंबई महापालिकेची खातीही AXIS बॅंकेतून काढणार

काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेने ऍक्‍सिस बॅंकेत असलेल्या कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत वर्ग केली आहेत.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील राजकीय कलगी-तुऱ्यामुळे ऍक्‍सिस बॅंकेला अजून एक झटका बसण्याची शक्‍यता आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेने ऍक्‍सिस बॅंकेतील सर्व खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये वळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेची खातीही ऍक्‍सिस बॅंकेतून काढणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेने ऍक्‍सिस बॅंकेत असलेल्या कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत वर्ग केली आहेत. ठाणेपाठोपाठ आता मुंबई महापालिकेनेही या बॅंकेतील कर्मचाऱ्यांची खाती इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांत वर्ग करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com