MUMBAI MUNICIPAL COMMISSIONER MEHATA TO JOIN CENTRAL GOVERNMENT ON DEPUTATION | Sarkarnama

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याची शक्‍यता

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

अजोय मेहता, संजय भाटीया, भगवान सहाय तसेच ज्येष्ठ अधिकारी मुकेश खुल्लर यांना अधिकाऱ्यांना केद्रांत सेवेसाठी जाण्याची संधी मिळू शकणार आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता हे केंद्रीय नगरविकास मंत्री वैकय्या नायडू यांच्या मंत्रालयात सचिव म्हणून जाण्याची शक्‍यता आहे.

शिवसेना भाजपा यांच्यात मुंबई महापालिकेत शीतयुद्ध सुरु असतानाही आयुक्त मेहता यांनी दोन्ही पक्षांना सांभाळून काम केल्याने त्यांची कारकिर्द आतापर्यत चांगली राहिली आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान यांचे नाव मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी चर्चिले जात आहे.

केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीसाठी बोलावण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकाऱ्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत असते.

1984 च्या बॅचच्या अजोय मेहता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या सेवेत महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी सध्या कार्यरत आहेत, त्यात आधारचे सीईओ अजयभूषण पांडे, शिंपीग कॉपोरेशनच्या मालीनी शंकर, पंतप्रधान कार्यालयाचे संचालक श्रीकर परदेशी यांचाही समावेश आहे.

आयएसए अधिकाऱ्यांच्या 1984 च्या बॅचच्या अधिकाऱ्यांमध्ये अजयभूषण पांडे, अजोय मेहता, मालीनी शंकर, संजय भाटीया, भगवान सहाय या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अजयभूषण पांडे आणि मालीनी शंकर हे केंद्रात सध्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे अजोय मेहता, संजय भाटीया, भगवान सहाय तसेच ज्येष्ठ अधिकारी मुकेश खुल्लर यांना अधिकाऱ्यांना केद्रांत सेवेसाठी जाण्याची संधी मिळू शकणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख