मुंबई महापालिकेतून अश्‍विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियानात बदली

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या सह निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.
Ashwini Joshi
Ashwini Joshi

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेत  अतिरिक्त आयुक्त  म्हणून काम करताना त्यांचा शिवसेना नगरसेवकांशी संघर्ष  झालेला होता . 

 अश्विनी जोशी या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या मर्जीतील अधिकारी समजल्या जातात.  

महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एम. काकाणी यांची नेमणूक मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून अश्विनी जोशी यांच्या जागेवर करण्यात आली आहे.   

मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा जोशी यांच्या विरोधात अविश्वास आणण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती. आपली चिकीत्सा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.

या योजनेच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी शिवसेनेने लावून धरली होती.जोशी यांच्याकडे गेल्याच आठवड्यात घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली होती.   

  डॉ. अश्विनी जोशी या आक्रमक अधिकारी म्हणून परिचित असून त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी म्हणून काम करताना नियमबाह्य बांधकामे करणाऱ्या आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही मोठ्या संस्थांवर कारवाई केली होती. काही इमारती सील केल्या होत्या. अनेक उच्चपदस्थांशी संघर्ष केला होता . 

ठाणे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. बेकायदा रेती आणि खडीचे उत्खनन, सरकारी जमिन गिळंकृत करणारे भू -माफिया यांच्यावर त्यांनी कठोर कारवाई केली होती . खाडीवर अतिक्रमण करूनउभी राहिलेली गोदामे आणि बेकायदा बांधकामावर त्यांनी कारवाई केले होती . 

 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच   आज तीन वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची समग्र शिक्षा अभियान प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

अश्विनी जोशी या मूळच्या चिपळूणच्या आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण  ठाण्यात झालेले  आहे  . त्या डेंटिस्ट आहेत.  त्या २००६ मध्ये झालेल्या यू .पी. एस. सी. परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम तर देशात तेराव्या आलेल्या होत्या.   

डॉ. अश्विनी जोशी यांनी भूषविलेले पदे 
सहाय्यक जिल्हाधिकारी - नागपूर  

प्रकल्प अधिकारी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , जिल्हापरिषद अकोला 

मुख्य कार्यकारी अधिकारी - जिल्हापरिषद भंडारा 

अति. जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा , मुंबई 

मुख्य कार्यकारी अधिकारी - अकोला जिल्हापरिषद 

मुख्य कार्यकारी अधिकारी- सिंधुदुर्ग जिल्हापरिषद 

कंट्रोलर ऑफ रेशनिंग  सिविल सप्लाय , मुंबई 

जिल्हाधिकारी ,ठाणे 

जिल्हाधिकारी ,मुंबई 

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , मुंबई

अतिरिक्त आयुक्त , मुंबई महापालिका 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com